औरंगाबाद ः कोरोना विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव वाढत असून, देशपातळीवर मोठ्या उपाययोजना सुरू आहेत. त्याच धर्तीवर राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २२) लागू केले; परंतु काहीजणांचा संचारबंदी लागू करण्यात आली, असा समज होत आहे.
पण ही केवळ जमावबंदी आहे, संचारबंदी नव्हे. जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमू नयेत आणि त्यांनी एकत्रितरीत्या फिरू नये, असे आवाहन पोलिस करीत आहेत.
जमावबंदी म्हणजे काय?
घाबरून जाऊ नका
जीवनावश्यक वस्तूंसंबंधी उदाहरणार्थ दूध, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू आपणास खरेदी करण्यासाठी दुकाने उघडी असतील. जमावबंदीमध्येही आपण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानावर जाऊ शकता. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अशावेळी एकाच व्यक्तीने खरेदीसाठी जाणे सोयीस्कर ठरेल. त्यामुळे गर्दीही टाळता येईल.
हेही वाचा - पुण्यात सन्नाटा
जमावबंदी आणि संचारबंदी यातला फरक
जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे महत्त्वाचे...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा आयुष्याशी निगडित आहे. विरोध म्हणून, बेफिकिरी करून चालणार नाही. पूर्वग्रह अथवा फाजील आत्मविश्वास दाखवून वेगळे काही करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
हेही वाचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.