कोरोनाचा धोका झुगारुन खुलताबादच्या टाकळी राजेरायमध्ये पुन्हा भरला आठवडे बाजार, स्थानिक प्रशासन गेले कुठे?

Weekly Market In Covid At Takali Rajeray
Weekly Market In Covid At Takali Rajeray
Updated on

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन करत असलेले उपाय योजनेला टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) येथील स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा सुरूंग लावत सलग तिसऱ्या गुरुवारी (ता.२५) आठवडे बाजार भरला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाजार बंद केले आहेत. परंतु टाकळी राजेराय येथील आठवडे बाजाराला हा आदेश लागु नाही का? या उपाययोजनेतुन या परिसराला वगळले की काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून या ठिकाणी सलग बाजार भरत असताना देखील स्थानिक पातळीवरील शासकीय अधिकारी होते कुठे? वरिष्ठांचे त्यांच्यावर किती वचक आहे? हे आता स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासूनच जुन्या बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली होती. परंतु त्यांना कोणीच विचारणारा नसल्यामुळे काही वेळातच परिसर पूर्णपणे भरला होता. गुरुवारी दुपारी जवळपास बारा वाजेपर्यंत हा बाजार सुरुच होता. कोरोनाचा धोका ग्रामीण भागात वाढत असताना देखील असे प्रकार घडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.


संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()