तुम्ही कितीही निर्बंध लावा, आम्ही आमच्या मर्जीनेच वागू!

उद्यानांत तोबा गर्दी : नागरिकांची समजूत काढताना प्रशासनाची कसरत
Aurangabad No matter many restrictions you impose we will we please
Aurangabad No matter many restrictions you impose we will we please
Updated on

औरंगाबाद : कोरोना संसर्ग (Corona infection) पुन्हा वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून निर्बंधाचे आदेश निघत आहेत. पण कितीही निर्बंध लावा आम्ही आमच्या मर्जीने वागणार... असेच चित्र शहरात आहे. महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यानात दररोज दीड ते दोन हजार नागरिक येत आहेत. शनिवार-रविवारी सुटीच्या दिवसी हा आकडा पाच हजारांवर जात आहे. कोरोनाविषयीचे नियम समजून घेत त्याप्रमाणे व्यवहार करा, असे त्यांना समजविताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहे.

Aurangabad No matter many restrictions you impose we will we please
ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेने सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद ठेवले होते. असे असले तरी प्रशासनाने सिध्दार्थ उद्यानात विविध विकास कामे केली. लहान मुलांसाठी आकर्षण असलेले सुपर हिरोचे पुतळे याठिकाणी बसवण्यात आले. खेळण्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे उद्यान खुले होताच नागरिकांची मोठी गर्दी होत होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. असे असताना उद्यानात मात्र दररोज मोठी गर्दी पाह्याला मिळत आहे. ज्यांनी

लसीचे डोस घेतलेले नाहीत त्यांची प्रवेशव्दारावर कोरोना चाचणी केली जात आहे, असे असले तरी नागरिकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. सिध्दार्थ उद्यानात शनिवार-रविवार वगळता रोज दीड ते दोन हजार नागरिक येतात तर शनिवार-रविवारी उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या पाच हजारांच्या घरात पोचलेली असते, असे असे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

Aurangabad No matter many restrictions you impose we will we please
राज्यातील रुग्णसंख्या वाढली! काल दिवसभरात 40 हजारच्या पार

ही गर्दी नियंत्रणात आणताना उद्यान विभागाला कसरत करावी लागत आहे. कोरोना चाचणी, सॅनिटायझेशन आणि मास्कचा वापर उद्यानात सक्तीचा करण्यात आला आहे असे पाटील यांनी सांगितले. अनेकजण उद्यानात डब्बे घेऊन येतात, त्यांना असे उघड्यावर डब्बे खाऊ नका असे सांगितले जाते. अनेक जण मास्क वापरत नाहीत. त्यांना विनंती केली जाते. काही जण प्रतिसाद देतात. काही जण जुमानत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्राणिसंग्रहालयात ब्रेक

प्राणिसंग्रहालयातील गर्दी चार-पाच दिवसात घटली आहे. सोमवारी ( ता. तीन) प्राणिसंग्रहालयाला ६६ हजार २८० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, गुरुवारी (ता. सहा) ४२ हजार ८० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्राणिसंग्रहालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.