OBC Reservation: खासदार कराड, आमदार सावे आणि केणेकरांना अटक

बाबा पेट्रोल पंपाकडून येणारा रस्ता व बाबा पेट्रोल पंपकडे जाणारा रस्ता यासह त्रिमूर्ती चौकाकडे जाणारा रस्ताही आंदोलकांनी अडवण्यात आला होता
karad
karadkarad
Updated on

औरंगाबाद: ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारणीतर्फे शनिवारी 26 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता आकाशवाणी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर, आमदार अतुल सावे खासदार भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बाबा पेट्रोल पंपाकडून येणारा रस्ता व बाबा पेट्रोल पंपकडे जाणारा रस्ता यासह त्रिमूर्ती चौकाकडे जाणारा रस्ताही आंदोलकांनी अडवण्यात आला होता. भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण रद्द करून राज्य सरकारने दोन्ही समाजाची फसवणूक केली आहे.

औरंगाबाद येथे खा. भागवत कराड, आ. अतुल सावे, संजय केणेकर, प्रविण घुगे, बापु घडामोडे, या सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आकाशवाणी चौकात, चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

karad
मराठा, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपचा जालन्यात चक्क जाम

यात खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे, भगवान घडामोडे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, माधुरी अदवंत, अमृता पोलादकर, प्रतिभा जराड, अनिल मकरिये, रामेश्वर भादवे, दीपक ढाकणे, राजु शिंदे, समीर राजूरकर, सागर पाले, बालाजी मुंडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे, मनोज भारसकर, संजय फतेलष्कर, राहुल नरोटे , शालिनी बुंदे, दौलत खान, जवाहरनगर पोलिस ठाणे व जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.