पोलिसांची औरंगाबादेत मोठी कारवाई, बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पकडले

पोलिसांना पुंडलिकनगर रस्त्यावरील सुपर वाईन शाॅपमध्ये बनावट नोटा देऊन दारु खरेदी केली जात असल्याची माहिती मिळाली.
Aurangabad Crime/Fake Currency
Aurangabad Crime/Fake Currency esakal
Updated on

औरंगाबाद : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad) पकडले आहे. ही कारवाई पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस.के खटाने यांनी पथकासह केली आहे. या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.२७) खबऱ्याने सांगितले की पुंडलिकनगर रस्त्यावरील सुपर वाईन शाॅपमध्ये बनावट नोटा देऊन दारु खरेदी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या प्रमाणे मंगळवारी (ता.२८) विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक खटाने (Fake Currency) यांनी सापळा रचला. संध्याकाळी सात वाजता रघुनाथ ढवळपुरे याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने सांगितले, की समरान ऊर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी याच्या मदतीने मुकुंदवाडीत भाड्याने घेतलेल्या रुमध्ये बनावट नोटा तयार करित होते.(Aurangabad Police Caught Fake Money Making Gang)

Aurangabad Crime/Fake Currency
Hingoli : हिंगोलीत ट्रक-लक्झरीचा भीषण अपघात,तिघांचा मृत्यू

नोटा अक्षय अण्णासाहेब पडुळ व दादाराव पोपटराव गावडे यांच्यामार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करतात, अशी माहिती मिळाल्यावर खटाने व त्यांच्या पथकाने मंगळवारी (ता.२८) छापा टाकून समरान ऊर्फ लक्की रशीद शेख (वय ३०, रा.जसवंतपुरा, नेहरुनगर, औरंगाबाद), नितीन कल्याणराव चौधरी ( २५, रा.मुकुंदवाडी, औरंगाबाद), अक्षय अण्णासाहेब पडूळ ( २८, गजानन नगर, औरंगाबाद), दादाराव पोपटराव गावंडे ( ४२, रा.गजानन नगर, औरंगाबाद), रघुनाथ चैनदास ढवळपुरे ( ४९, रा.गजानन नगर, औरंगाबाद) यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून ५००, १००, ५० रुपयांच्या बनावट चलनी नोटा सुमारे एक लाख २० हजार रुपये किंमतीच्या जप्त (Aurangabad Crime) करण्यात आल्या.

Aurangabad Crime/Fake Currency
नांदेडच्या काॅफी शाॅपमध्ये अश्लील चाळे, पोलिसांची कारवाई

तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य काॅम्प्युटर, वन प्रिंटर, कटर, स्केल, कार आणि पाच मोबाईल असा एकूण तीन लाख १० हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस अंमलदार गणेश डोईफोड यांच्या फिर्यादीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()