नोकरभरतीवर कोरोनाछाया; महापालिका अंदाज घेऊन राबविणार प्रक्रिया

राज्य शासनाने नवीन आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी दिल्यामुळे महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे
auranagabad
auranagabadsakal
Updated on

औरंगाबाद: राज्य शासनाने नवीन आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी दिल्यामुळे महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी आता तिसऱ्या लाटेचे संकट ओढावले आहे. केंद्र शासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नोकरभरतीसाठी अंदाज घेतला जात असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

auranagabad
मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड

महापालिकेची नवीन आकृतिबंध मंजूर करताना राज्य शासनाने याआधीची मंजूर चार हजार ७६३ पदासोबत नवीन ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण पाच पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. त्यात जुनी सुमारे पाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असून, सेवा भरती नियम मंजूर झाल्यानंतर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे तीनशे ते चारशे पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी

सांगितले की, अधिकारी-कर्मचाऱ्याशी अनेक पदे रिक्त आहेत. त्यानुसार नोकरभरतीसाठी तयारी आहे. पण प्रक्रिया सुरू झाली आणि त्यात तिसरी लाट आली तर मध्येच अडचण येऊ शकते. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत. काही दिवसात तिसऱ्या लाटेचा अंदाज येईल. त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविली जाईल.

गर्दी होण्याची शक्यता

नोकरभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या संख्येने अर्ज येतात. त्यामुळे परीक्षेसाठी गर्दी होऊ शकते, म्हणून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती संपल्यानंतरच नोकरभरती प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्यच्या परीक्षेत ससेहोलपट अन् भुर्दंड

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदासाठी शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता.२६) होणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. याचा फटका राज्यातील नऊ लाखांवर उमेदवारांना बसला. त्यातच शनिवारी परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षास्थळी पोहचले होते; त्यांना मनस्ताप व भुर्दंड सहन करावा लागला. अनेकांची धावपळ झाली तर मुलींना व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचीही ससेहोलपट झाली असून त्यांना त्रागा सहन करावा लागला.

आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ‘क’ व ‘ड’ प्रवर्गातील परीक्षा शनिवार व रविवारी राज्यभरात विविध केंद्राहून घेण्यात येणार होती. पण नेहमीसारखा यावेळीही प्रवेशपत्रातील गोंधळ समोर आला होता. राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटांमध्ये चूका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र या सर्व गोंधळामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. औरंगाबादच्या अनेक उमेदवारांची परीक्षा केंद्रे नागपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये असल्याचे दिसून आले. तालुका स्तरावरही परीक्षाचे केंद्र देण्यात आली.

परीक्षा असल्याने असंख्य विद्यार्थी शुक्रवारी सकाळीच परीक्षेला दुरवरच्या केंद्राकडे निघाले. ते प्रवासानंतर केंद्रस्थली पोहचले असतानाच नेमकी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. कोरोनाचा काळ असल्याने व हाती रोजगार नसल्याने विद्यार्थी, बेरोजगार तरुण त्रस्त आहेत. कशी-बशी भरती निघाल्यानंतर त्यांना मोठी आशा होती. त्यांनी अनेक स्वप्न बघत परीक्षेची तयारी सुरु केली. जोरदार तयारी करुन परीक्षेसाठीही निघाले पण परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांच्या पर्यायाने पालकांच्या खिशाला भुर्दंड बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.