औरंगाबाद : शहरातील तापमानाने सोमवारी ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने आरोग्य व प्रशासनाच्यातीने औरंगाबादकरांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारीही शहरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांमध्ये शहराचे तापमान कायम राहण्याची शक्यता असून दुपारी १२ ते ३.३० या वेळेमध्ये उन्हात न फिरण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुचविले आहे. त्यानुसार रुग्णालयांना पुरेसा औषधसाठा व इतर तयारी, संबंधितांना प्रशिक्षण, सार्वजनिक ठिकाणी उष्णतेपासून बचावासाठी तात्पुरती व्यवस्था, पशू, प्राण्यांसाठी औषधे, पाणी व चारा व्यवस्था यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
गुरांची काळजी घ्या
गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
काय करावे
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व दुपट्ट्यांचा वापर करावा. कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
काय करू नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० उन्हात वाजताच्या कालावधीत बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट कपडे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्यास टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.