मागणी हजारांवर अन् कोरोना प्रतिबंधात्मक लसी मिळाल्या फक्त दीडशे

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या हजारांत आणि येणाऱ्या लसींची संख्या शेकड्यात अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिवना (जि.औरंगाबाद) : लसीकरण केंद्रावर नागरिकांची झालेली गर्दी.
शिवना (जि.औरंगाबाद) : लसीकरण केंद्रावर नागरिकांची झालेली गर्दी. शिवना (जि.औरंगाबाद) : लसीकरण केंद्रावर नागरिकांची झालेली गर्दी.
Updated on

शिवना (जि.औरंगाबाद) : शिवना (ता.सिल्लोड) (Sillod) येथील लसीकरण केंद्राला (Vaccination Site) गुरुवारी (ता.सहा) अवघ्या एकशे पन्नास लस प्राप्त झाल्या आहेत. लस दीडशे आणि मागणी हजारांवर त्यामुळे आज या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे सेंटरवर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच. पण केंद्रावरील यंत्रणेचीही तारांबळ उडाली. जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन राऊत तेथे दुपारपर्यंत ठिय्या मांडून होते. शिवना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या दहा ते बारा गावांमधील नागरिक कोविशिल्डची लस (Covishield Vaccine) घेण्यास टाळाटाळ करत असल्याने मागील आठवड्यात जवळपास तीनशेवर लसींचे डोस परत गेले होते. (Aurangabad Today News Demand Huge But Corona 150 Vaccine Doses Reaches In Shivna)

शिवना (जि.औरंगाबाद) : लसीकरण केंद्रावर नागरिकांची झालेली गर्दी.
Video: औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी गर्दी, नागरिकांना केंद्र बंद करण्याची धमकी

अजिंठा (ता.सिल्लोड) येथील ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या खेडेगावांतही हीच परिस्थिती होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या हजारांत आणि येणाऱ्या लसींची संख्या शेकड्यात अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने ही परिस्थिती गांभीर्याने हाताळावी, अशी मागणी होत आहे. लोकांची मागणी पाहून आम्ही आरोग्य विभागाकडे लसींचा शिल्लकीचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती शिवन्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आकिब सय्यद यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.