औरंगाबाद : वडिलांना कोरोनाची बाधा (Corona) झाली. पाठोपाठ पत्नी, मुलगी, मुलगा, आई व स्वतः कुटुंबप्रमुखालाही लागण झाली. सहा जणांचे पूर्ण कुटुंबच बाधित झाले. अपार्टमेंटमध्येही काहीजण बाधित आले. चहूबाजूने कोरोनाने घेरले; पण एकीने लढले. जिद्द व मनोधैर्याच्या जोरावर कुटुंबाने कोरोनावर मात केलीच; विशेषतः नऊ दिवस ‘आयसीयू’त (ICU) असलेल्या कुटुंबातील आजोबांनी लढा दिला व जिंकुनही दाखविला. केवळ उपचारच नव्हे तर कौटुंबिक एकी, धीर आणि आधारही महत्वाचा असतो हेच कोरोनाने शिकविले. शहरातील व्यावसायिक स्नेहलचंद्र सलगरकर यांच्या कुटुंबाची धैर्याची कहानी. (Aurangabad Today News Family At Time Cured Frome Corona)
त्यांचे वडील नंदकिशोर सलगरकर (वय ७७), पत्नी श्रृती व मुलगी सिद्धी हिची कोविड चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. तिघांना कांचनवाडीच्या ‘सीएसएमएसएस’ ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल केले. त्यानंतर एक एप्रिलला स्नेहलचंद्र यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. रात्रीतून तातडीने रुग्णवाहीका मागवून त्यांना चाचणी केंद्रावर नेले. त्यांची ॲन्टीजेन चाचणी ‘पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले. दुसऱ्या दिवशी मुलगा श्लोक व आई सुमंगला यांचीही चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. सर्वांवर कांचनवाडीतील कोविड सेंटरमध्ये एकाच ठिकाणी उपचार सुरु झाले. डॉ. देशमुख व स्टाफने त्यांची वेळोवेळी काळजी घेतली. यादरम्यानच स्नेहलचंद्र व त्यांच्या वडीलांची प्रकृती खालावली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वडीलांना ‘आयसीयू’त ठेवावे लागले. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळीही (८९-९०) खालावली होती. ‘सिटीस्कॅन’मध्ये स्कोअर १३ होता. एवढे असूनही आजोबांनी यशस्वी लढाई लढत जिंकली. इतर कुटुंबातील सर्वांना टप्प्या-टप्प्याने सुटी झाली.
घरातही होता ऑक्सिजन
३१ मार्चनंतर सतरा दिवस ७७ वर्षीय नंदकिशोर सलगरकर यांनी यशस्वी लढा दिला. सुटी झाल्यानंतरही त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर घरी ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. २ मे रोजी त्यांच्याच सल्ल्याने आजोबांचा कृत्रिम ऑक्सिजन काढण्यात आला. कोविड सेंटरचे डॉ. देशमुख व खासगी रुग्णालयाचे डॉ. आशिष देशमुख यांच्या पाठबळ व उपचार महत्वाचे ठऱले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.