StartUpInAurangabad : ‘स्टार्टअप इको’च्या जागतिक यादीत औरंगाबाद

स्टार्टअप
स्टार्टअप
Updated on
Summary

यंदा पुन्हा भारताने पहिल्या २० देशांत स्थान मिळवले आहे. या यादीत औरंगाबाद देशात ३६ व्या स्थानी आहे आणि दक्षिण आशियामध्ये ४२ वा क्रमांक येतो. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचाही या यादीत समावेश आहे.

औरंगाबाद : जगभरातील स्टार्टअपची दखल घेत त्यास प्रोत्साहन देणाऱ्या ‘स्टार्टअप ब्लिंक’च्यावतीने २०२१ मधील स्टार्टअप इकोसिस्टिम वर्ल्ड रॅंकिंग Startup Ecosystem World Ranking जाहीर करण्यात आले आहे. या यादीत जगभरातील १०० देशांतील एक हजार शहरांच्या यादीत औरंगाबाद ८८५ व्या क्रमांकावर असल्याचे ‘स्टार्टअप ब्लिंकच्या रँकिंग’मधून समोर आले आहे. इन्क्युबेशन सेंटरने नवीन स्टार्टअपला दिलेल्या भक्कम पाठबळामुळे जगभरातील शहरांतील यादीत येण्याचा मान प्रथमच औरंगाबादला मिळाला आहे.

दरवर्षी स्टर्टअप ब्लिंक StartupBlink हे जगभरातील स्टार्टअप आणि त्यासाठी पोषक असलेल्या शहरांचा अभ्यास करीत रॅंकिंग जाहीर करीत असते. गेल्या वर्षी भारत या रँकिंगमधील पहिल्या २० मधून बाहेर पडला होता. यंदा पुन्हा भारताने पहिल्या २० देशांत स्थान मिळवले आहे. या यादीत औरंगाबाद Aurangabad देशात ३६ व्या स्थानी आहे आणि दक्षिण आशियामध्ये ४२ वा क्रमांक येतो. राज्यातील मुंबई Mumbai, पुणे Pune, नागपूर Nagpur, नाशिक Nashik या शहरांचाही या यादीत समावेश आहे. यासाठी तीन पॅरामीटर्स लावण्यात आले होते. ज्यात मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसायपूरक वातावरण अशा तीन मापदंडांचा अभ्यास करून शहरांची निवड केली जाते. औरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणीक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत औरंगाबादेत नवनवीन स्टार्टअप उभे राहिले आहेत. याला स्थानिक औद्योगिक संस्था सीएमआयएचे ‘मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’ (मॅजिक) Magic, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘बजाज’च्या Bajaj सहकार्याने सुरू केलेले इन्क्युबेशन सेंटर आणि विविध महाविद्यालयांनी सुरू केलेल्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे नवतरुणांना राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल असे स्टार्टअप सुरू करण्यात यश आले. याचीच दखल घेत या यादीत औरंगाबादचा समावेश झाला आहे.aurangabad top in startup blink ranking

स्टार्टअप
Latur Rain Updates : लातूर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस

आता ‘स्टार्टअप’साठी धोरणची गरज

‘स्टार्टअप’मधून गेल्या तीन ते चार वर्षांत नवीन उद्योगांची सुरुवात झाली आहे. आता आपल्याला स्टार्टअपला पाठबळ देणे गरजेचे आहे. यासह औरंगाबाद शहरातून नवोद्योजक तयार करीत त्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नवीन स्टार्टअप विषयी धोरण ठरविणे गरजेचे आहे. यातून उद्योगांप्रमाणे सेवा-सवलती देत वातावरण आणखी पोषण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

‘स्टार्टअप ब्लिंक’च्या यादीत औरंगाबाद आल्याने सर्वांच्या नजरा इकडे लागल्या आहेत. ‘मॅजिक’च्या माध्यमातून आम्ही २०१५ पासून औरंगाबादेत स्टार्टअपला पूरक कार्य सुरू केले. त्याचा परिणाम आता दिसत आहे. स्टार्टअपसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आणि वातावरण निर्मिती गेल्या सहा वर्षांत ‘मॅजिक’ने यशस्वीरीत्या केली आहे. यामुळे आपल्याकडे जनजागृती झाली असून भविष्यात औरंगाबादला मिळालेली ही रॅकिंग आणखी वाढेल.

-आशीष गर्दे, संचालक, मॅजिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()