औरंगाबाद : अडीच लाखावर नागरिकांचा अद्याप दुसरा डोस बाकीच

नागरिकांच्या उदासीनतेमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी
corona second dose
corona second dosesakal
Updated on

औरंगाबाद : पहिला डोस घेऊन ८४ दिवसांची मुदत संपली तरी जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ८५० नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. नागरिकांच्या उदासीनतेमुळे आरोग्य विभागाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या वतीने विविध पद्धतीने कोरोना लसीकरणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ८५० नागरिकांनी त्यांच्या कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यात उदासीनता दाखवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ५ हजार ९५३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर ९ लाख ८४ हजार ५७५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात १५ ते १८ या वयोगटातील २ लाख १३ हजार ८७० विद्यार्थ्यींपैकी १ लाख १ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान जिल्ह्यात शंभर टक्के कोरोनाचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आता युनाटेड स्टेटस् ऑफ अमेरिका व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आरोग्य विभागाला मदत करणार आहे.

corona second dose
कॅन्सरचा धोका वाढवणारे हे पदार्थ टाळा

दुसरा डोस बाकी असलेले नागरिक

  • औरंगाबाद - ४८६७७

  • गंगापूर - ३७३०६

  • कन्नड - ३९८५३

  • खुलताबाद - ३९४१

  • फुलंब्री - १२९१९

  • सिल्लोड - ३३५०५

  • सोयगाव - ९४०२

  • वैजापूर - ३६१६७

corona second dose
कॅन्सरग्रस्तांचा सवाल : मरण जवळ करायचं का?

जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८ रुग्ण

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध अभियानामध्ये जिल्ह्यात ३८ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पैठण, फुलंब्री प्रत्येकी-२, कन्नड, सोयगाव प्रत्येकी १२, गंगापूर -६ तर मनपा हद्दीत २ असे ३८ रुग्ण हे कुष्ठरोगाचा सामना करत आहेत. कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.