Aurangabad Unlock: औरंगाबाद शहरातील संचारबंदी उठली; जाणून घ्या नियमावली

खेळाची मैदाने, उद्यानात करा आता नियमांचे पालन करून वॉकींग
Aurangabad
AurangabadAurangabad
Updated on

औरंगाबाद: महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा पॉजिटीव्हिटी रेट (positivity rate) २.२४ टक्के तर ऑक्सिजन बेडची टक्केवारी २२.१९ इतकी असल्याने सोमवार (ता. सात) पासून औरंगाबाद शहरातील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले (Aurangabad lockdown relaxation) आहेत. सोमवारपासून शहर अनलॉक करण्यात आल्याने सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांच्या स्वाक्षरीने रविवारी (ता.सहा) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रातील कोविड १९ विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकिय अहवालाच्या आधारे महापालिका क्षेत्रातील रूग्णांची टक्केवारी २.२४ टक्के त ऑक्सिजन बेडची टक्केवारी २२.१९ इतकी आहे.

Aurangabad
PHOTOS: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी देवीचे मंदिर

ही टक्केवारी शासनाच्या वर्गवारीनुसार महापालिका क्षेत्र लेवल १ मध्ये आले आहे. त्याअनुषंगाने सोमवार (ता.सात) पासून ब्रेक द चेनसाठी निर्बंध शिथिल करून पुढील आदेशापर्यंत सुधारीत आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसर भारत सरकारने कोविड १९ संदर्भाने आवश्‍यक असलेल्या मास्कचा वापर, सहा फूट अंतर, सॅनिटायझरचा वापर, आवश्‍यकतेनुसार फेसशिल्डचा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधांचा वापर करण्याच्या अटींचे पालन करत निर्बंध उठवले आहेत.

० अत्यावश्‍यक वस्तू व सेवासंबंधी व्यवसाय व दुकाने, अत्यावश्‍यक वस्तू व सेवाव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने पुर्णपणे उघडणार.

० मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू

० रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सुरू

० सार्वजनिक ठिकाणे, गार्डन, मोकळ्या जागा, क्रिडांगणे या ठिकाणी फिरायला जाता येणार आहे. सायकलींग करता येईल

० खासगी अस्थापना, शासकीय, निमशासकिय,खासगी कार्यालये ४ जून २०२१ च्या निर्देशानुसार जसे खासगी बॅंका,विमा, औषध कंपनी, मायक्रो फायनान्स कंपन्या, नॉन बॅंकींग वित्त संस्था कार्यालयीन वेळेत १०० टक्के उपस्थितीने सुरू राहतील.

० क्रिडा, चित्रीकरण, स्नेहसंमेलने, सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू राहतील.

Aurangabad
Corona Updates: चांगली बातमी! मराठवाड्यात दुसऱ्या लाटेला ओहोटी

० लग्न समारंभ, सभा, निवडणुका, अंत्यविधी, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभांना परवानगी.

० बांधकामे, कृषी संबंधित सर्व बाबी, ई - कॉमर्स वस्तू व सेवा सुरू

० जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सुरू

० सार्वजनीक बस वाहतुक सुरू होईल मात्र उभे राहून प्रवास करता येणार नाही.

० कार्गो वाहतुक सर्विसेस जास्तीत जास्त तीन व्यक्तिंसह करता येणार आहे.

० उत्पादन क्षेत्र (निर्यात प्रधान उद्योग), उत्पादन क्षेत्र (अत्यावश्‍यक वस्तू व त्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा, निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, संरक्षण संबंधित उद्योग, डेटा सेंटर, क्लावुड सर्विस प्रोव्हायडर, आयटी संबंधी सेवा, गुंतागुंत पायाभुत सेवा व उद्योग ) सुरू.

आरटीपीसीआर बंधनकारक

सर्व उद्योग, व्यवसाय अस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची नेगेटीव आरटीपीसीआर अहवाल सोबत बाळगावा त्याची १५ दिवस वैधता राहिल. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारी संपेपर्यंत संबंधित दुकान, अस्थापना बंद ठेवण्यात येईल. तसेच यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाईल वरील सर्व आदेश आवश्‍यकतेनुसार रद्द किंवा त्यात बदल केले जाऊ शकतील असेही आदेशात म्हटले आहे.

...मात्र उभे राहून प्रवास नाही

खासगी कार, टॅक्सी, बस, ट्रेनने अंतर जिल्हा प्रवासी वाहतुक पुर्ण क्षमतेने सुरू करता येईल. मात्र उभे राहून प्रवास करता येणार नाही. जर प्रवासी लेवल ५ मधील भागातुन किंवा जिल्हामार्गाने प्रवास करत असेल तर अशा प्रवाशांना ई - पास आवश्‍यक राहिल असे या आदेशात म्हटले आहे.

Aurangabad
शंभरात पाच टक्के मुलांनाच कोरोनाची गंभीर लक्षणे!

महापालिका क्षेत्र, ग्रामीण स्वतंत्र निर्णय-

राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेला अनुकूलता दाखवल्यानंतर पाच गटामध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आले. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश आहे, यामुळे तिसऱ्या गटातील नियम लागू होतील अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग असा पॉजिटीव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा विचार करून महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग असे दोन वेगवेगळे निर्णय घेण्यात आले, यातुन शहरवासियांना लॉकडाऊनमधून पुर्णपणे सुटका मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.