रस्ता ओलांडताना वानराच्या पिल्लाचा अपघात, आई-पिल्लाची ताटातूट

वानराचे जखमी पिल्लू बिलगले वन्यजीव अभ्यासकाच्या पायाला
Aurangabad News
Aurangabad Newsesakal
Updated on

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा. तो ओलांडणे कधीकधी माणसालाही शक्य होत नाही. चिकलठाण्यातील वर्दळीवर तर बोलायलाच नको. नेमके तिथेच एक वानराचे पिल्लू आपल्या आईसोबत रस्ता ओलांडायला लागले आणि घात झाला. एका भरधाव चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. यात आईशी ताटातूट झालीच, शिवाय पिल्‍लूही गंभीर जखमी झाले. काही वेळात तिथे दाखल झालेल्या वन्यजीव अभ्यासकाच्या पायाला जेव्हा ते पिलू बिलगले तो प्रसंग तर मन हेलावणारा (Aurangabad) होता. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले कि, चिकलठाणा परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजता आईसोबत वानराचे एक पिल्लू रस्ता ओलांडत होते. भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. आई पुढे निघून गेली. पिलाचा अपघात झाला. वाहनांची एवढी वर्दळ होती कि, त्याला पुढे जाताच आले नाही. अपघातात पिलाच्या हातासोबत तोंडालाही गंभीर जखम झाली होती. अवघ्या तीन महिन्यांचे ते वानराचे पिल्लू भेदरलेलं होते. मात्र, एका जागी शांत बसून राहिले. (Wild Life)

Aurangabad News
शेतात जाऊन येतो असे सांगून गेलेल्या तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ वन विभागाला कळविले. वन विभागाचे पथक निघालेच होते. त्याचवेळी वनपरिमंडळ अधिकारी आप्पासाहेब तागड यांनी वन्य अभ्यासक श्रीकांत वाहुळे यांना तिथे पोचायला सांगितले. वनविभागाची रेस्क्यू व्हॅन तिथं पोचली. लागलीच त्या पिल्लाला ताब्यात घेत कामगार चौक येथील पशुवैद्यकीय डॉक्टर शीला जाधव यांच्याकडे नेले. वानराच्या पिलाच्या अपघाताने एक डोळा निकामी झाला होता. त्याच्यावर औषधोपचार केले. जखमी पिलामध्ये सुधारणा होईपर्यंत वनविभागामध्ये ठेवले जाणार आहे. नंतर त्याला आईजवळ सोडण्यात येणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांच्या मार्गदर्शनात आप्पासाहेब तागड, वनरक्षक एच. के. गुसिंगे, वन्यजीव अभ्यासक श्रीकांत वाहुळे, वनरक्षक व्ही. आर. साळवे, वनरक्षक उज्वला सोनवणे यांनी मोलाची कामगिरी केली.

ते पिल्लू पायालाच बिलगले!

श्रीकांत वाहुळे यांनी म्हणाले कि, मी तिथे पोचल्यानंतर वानराच्या जखमी पिलाच्या डोक्यावरून हात फिरवला. तर ते पिल्लुही माझ्या पायाला बिलगले. हा प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारा होता. अपघातामुळे आईशी झालेली ताटातूट त्यात लगेच फिरलेला मायेचा हात यामुळे पिलाची ही कृती हृदयस्पर्शी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.