सिल्लोड-भोकरदन रस्ता रहदारीसाठी बंद, पावसामुळे रस्ता चिखलमय

पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला.
Aurangabad News
Aurangabad Newsesakal
Updated on

शिवना (जि.औरंगाबाद) : पुलाच्या कामासाठी काळ्या मातीचा भराव टाकून तयार केलेला वळण रस्ता पावसात चिखलाने माखल्याने या रस्त्यात शुक्रवारी (ता.१५) एक अवाढव्य ट्रक फसला. त्यामुळे शिवना (ता. सिल्लोड) ते भोकरदन शहराला जोडणाऱ्या या रस्त्यावर जवळपास चार तास वाहतूक ठप्प झाली होती. शिवना येथील शिवाजीनगर वसाहतीलगत महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रासमोर सध्या पुलाचे काम सुरू आहे. (Aurangabad Updates Sillod Bhokardan Close For Transport)

Aurangabad News
मोदींपेक्षा चांगला श्रोता मिळालाच नाही, विवेक अग्निहोत्रींनी केली प्रशंसा

संबंधित कंत्राटदाराने या पुलाच्या कामासाठी वळण रस्ता काढला. मात्र, त्यावर मुरूम न टाकता काळ्या मातीचा भराव टाकला. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला. यातून लहान-मोठी वाहने सुरुवातीला निघाली. मात्र, रिमझिम पावसात या रस्त्यावर चिखल झाल्याने हे अवजड वाहन फसले. (Aurangabad News)

Aurangabad News
देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

त्यानंतर जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने ट्रकला बाहेर काढल्या नंतरही या रस्त्यावर भलमोठा खड्डा पडल्याने वाहतूक सुरळीत झाली नाही. सिल्लोड (Sillod) व भोकरदन या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर सध्या रहदारीसाठी बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.