एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने औरंगाबादकर त्रस्त, शहर बससेवा विस्कळीत

एसटी बस कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका दुसऱ्यादिवशीही औरंगाबादकरांना बसला आहे.
Aurangabad News (Photo By Sachin Mane)
Aurangabad News (Photo By Sachin Mane)esakal
Updated on

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा (ST Workers Strike) फटका दुसऱ्यादिवशीही औरंगाबादकरांना बसला आहे. आजही शुक्रवारी (ता.२९) पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. अनेकांना इच्छा नसतानाही खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मजवून प्रवाश करावा लागत आहे. दुसरीकडे औरंगाबादमधील शहर बससेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शहरवासीयांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. येथील सिडको बसस्थानकात (Aurangabad) सकळापासूनच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बसची वारंवारित कमी आहे.

Aurangabad News (Photo By Sachin Mane)
बीडमधील परळीत गांजाची सामुहिक शेती, दोघांना घेतले ताब्यात

जर एखादी बस मिळाली तर त्यात मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. औरंगाबादहून मंठ्यासाठी ३०० तर बीडसाठी २०० रुपये खासगी वाहने सर्वसामान्यांकडून घेत आहे. त्यात दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे बहुतेक लवकरात-लवकर घरी पोहोचण्याच्या घाईत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.