Aurangabad : वाल्मीच्या दोन अधिकाऱ्यांनी घेतली लाच

पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार केली
लाच
लाच sakal
Updated on

औरंगाबाद : तक्रारदाराच्या कंत्राटदार मित्राने वाल्मी कार्यालयांतर्गत केलेल्या ११ लाख ५० हजार रुपयांचे काम मंजूर केले म्हणून आणि आणखी आठ लाख ९० हजार रुपयांचे काम मंजूर करण्यासाठी टक्केवारी म्हणून तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाल्मी अर्थात जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ३० जानेवारीच्या मध्यरात्री अटक केली.

वर्ग दोन, लेखाधिकारी, अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय अधिकारी (वाल्मी), प्रदीप प्रल्हाद बाहेकर (वय ४७, रा. प्लॉट क्र.३३, फ्लॅट ७. पारिजातनगर, एन-४), वर्ग दोन लेखाधिकारी मोहन दशरथ शेलार (वय ५२, रा. व्हिजन सिटी) अशी लाच घेणाऱ्या दोघा आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार वाल्मी संस्थेअंतर्गत काम मिळवून देण्यासाठी सदर अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे ३० जानेवारी रोजी पैशांची मागणी केली होती.

मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करत सापळा लावला असता ३० जानेवारीच्या रात्री कांचनवाडी येथील व्हिजनसिटी इमारतीसमोर लाच घेताना अटक करण्यात आली. दोघांविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांच्यासह पथकातील सुनील पाटील, साईनाथ तोडकर, विलास चव्हाण यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.