प्रवाशांचे हात धरून रिक्षात बसवण्याची स्पर्धा!

रेल्वेस्थानक, बसस्थानक, महावीर चौकात प्रकार; रिक्षाचालकांची अरेरावी, उद्धटपणा कसा रोखणार?
Aurangabad
AurangabadAurangabad
Updated on
Summary

रेल्वेस्थानक, बसस्थानक, महावीर चौकात प्रकार; रिक्षाचालकांची अरेरावी, उद्धटपणा कसा रोखणार?

औरंगाबाद: शहरात रिक्षाचालकांच्या अरेरावीचा अनुभव पुन्हा येत आहे. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह शहराच्या विविध भागात रिक्षचालकांची प्रवाशांना रिक्षात बसवण्यासाठी हाताला धरुन ओढण्यापर्यंत मजल गेली आहे. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांच्या बरोबरही अशाच पद्धतीने वर्तन केले जात असल्याने असंतोष पसरत आहे. कोरोनानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने रिक्षांनाही परवानगी देण्यात आली. दिर्घकाळ रिक्षा वाहतूक बंद असल्याने या वर्गावर सर्वाधिक उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळेच पुन्हा रिक्षा सुरु झाल्यानंतर रिक्षाचालकांच्या वर्तनात आणि उद्धटपणामध्ये फरक पडेल अशी अपेक्षा फोल ठरली आहे. रिक्षाचालक हे पूर्वीप्रमाणेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

शहरात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकावर बाहेरगावावरुन बस आल्यानंतर प्रवाशांना रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालकांध्ये अक्षरशः स्पर्धा लागत आहे. हाच प्रकार रेल्वेस्थानकाच्या बाहेरही सुरु आहे. एका प्रवाशाला तीन-चार रिक्षाचालक हाताला धरुन ओढण्याचा प्रयत्न करतात. प्रवाशाला सिडको, हडको, रामनगर, गजानन मंदीर, गारखेडा कुठे जाणार अशी विचारणा केली जाते. प्रवाशाने नाही सांगीतल्यानंतर मग कुठे जाणार अशी विचारणा करुन पुन्हा प्रवाशाला त्रास दिला जातो. बसस्थानकांप्रमाणे महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथेही याच पद्धतीने प्रवाशांना रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालक हाताला धरुन ओढण्याचा प्रयत्न करतात. प्रवाशी महिला आहे किंवा पुरुष याचे भान न ठेवताच रिक्षाचालक उद्धट वर्तन करत असल्याने महिला प्रवाशी तर त्रस्त झालेल्या आहेत.

Aurangabad
Corona Update: बीडमधील वाढती रुग्णसंख्या ठरतेय चिंताजनक

पोलिसांच्या समोरही तेच-
रिक्षामध्ये प्रवाशी बसवण्यासाठीचा अत्यंत गंभीर प्रकार पोलिसांसमोर दिवसभर सुरु असतो. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे अनेकवेळा पोलिसांची गस्त सुरु असताना हा प्रकार पहाणारे पोलिस अशा रिक्षाचालकाला रोखण्याचा प्रयत्न करत नाहीत. हीच परिस्थिती महावीर चौकातही आहे. या चौकात कायम वाहतूक पोलिस असतात, मात्र पोलिसांना हा प्रकार रोखण्याची गरज वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.