Startup : मिळणार सेकंड हँड गाडीची कुंडली ! मराठवाड्याच्या तरुणांच्या स्टार्टअपला मिळालं पेटंट

वाहन घेताना तांत्रिक धोका टाळता यावा यासाठी अनिकेत प्रभाकर म्हस्के आणि कॅप्टन गौरव जाधव यांनी ‘ऑटो शिल्ड ॲशुरन्स’ नावाने स्टार्टअप सुरु केले
Auto Shield Assurance Startup give all information of second hand vehicle
Auto Shield Assurance Startup give all information of second hand vehicle sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही काही वर्षे वापरलेले ‘सेकंड हॅण्ड’ वाहन घेणार असाल, तर वाहन विक्री करणारा नेहमी वाहन खूपच चांगले असल्याचे सांगतो. वाहनाला नवीन रंग दिलेला असल्याने ते डोळ्यांनी चकाचक दिसते.

यातील तांत्रिक बाजू कळत नसल्याने आपण एखाद्या गॅरेज चालकाची मदत घेतो. मात्र, त्यातूनही अनेक तांत्रिक बाजू राहून जातात. आपण लाखो रुपये खर्च करुन जुने वाहन घेतो; मात्र काही महिन्यानंतर कळते, की त्यामध्ये इंजिनसह तांत्रिक बिघाड आहे. अनेक पार्ट, इलेक्ट्रीक सिस्टीम बरोबर नाही.

वाहन घेताना हा तांत्रिक धोका टाळता यावा यासाठी अनिकेत प्रभाकर म्हस्के आणि कॅप्टन गौरव जाधव यांनी ‘ऑटो शिल्ड ॲशुरन्स’ नावाने स्टार्टअप सुरु केले आहे. यात एखादे जुने वाहन घ्यायचे असल्यास त्याची तपासणी (हेल्थ चेकअप) करुन तब्बल ३०० पॅरामीटर्सद्वारे संपूर्ण ‘कुंडली’च गोळा केली जाते.

त्यामुळे वाहनाची नेमकी काय स्थिती आहे, हे घेणाऱ्यांना कळते. अनिकेत म्हस्के आणि कॅप्टन गौरव जाधव यांनी वाहनांच्या तपासणीसाठी विकसित केलेल्या ‘ऑटो शिल्ड अशुरन्स’ या पद्धतीला पेटंटही मिळाले आहे.

जुने वाहन खरेदी-विक्री करताना अडचणी

अनिकेत प्रभाकर म्हस्के हे मूळचे छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे. त्यांचे २०१४ या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. मॅकेनिकलचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षणानंतर त्यांनी तीन वर्षे आयटी कंपनीत नोकरी केली.

Auto Shield Assurance Startup give all information of second hand vehicle
National Startup Awards : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारासाठी अर्जाची 31 मेपर्यंत अंतिम मुदत

२०१७ मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी पॅरामेडीकल, नर्सिंग, फार्मसीचे स्कील मीट ॲकॅडमी नावाने इन्स्टीट्यूट सुरु केले. त्याच्या शाखा छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे आहेत. तसेच त्यांचे सहकारी कॅप्टन गौरव जाधव हे व्यावसायिक पायलट आहेत. आपले इन्स्टीट्यूट सांभाळत अनिकेत म्हस्के हे चार वर्षांपासून कारची खरेदी-विक्री करतात.

Auto Shield Assurance Startup give all information of second hand vehicle
Startup : वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या पाण्याच्या ‘पुर्नरवापर’ उपकरणाची निर्मिती

मात्र, यात त्यांच्यासमोर अनेक तांत्रिक अडचणी आल्या. वाहन डोळ्यांनी चांगले दिसते. तिला नवीन रंग दिलेला असतो. इंजिनची स्वच्छता केलेली असते. मात्र, तेच वाहन खरेदी केल्यानंतर काही महिन्यात त्यातील अनेक तांत्रिक बिघाड समोर येतात.

अशा अनेक अडचणी येत असल्याने त्यांनी मार्केटचा अभ्यास करुन कारसह इतर वाहनांचा सूक्ष्म पद्धतीने तांत्रिक माहिती मिळविण्यासाठी ‘ऑटो शिल्ड ॲशुरन्स’ नावाचे स्टार्टअप सुरु केले. वाहनांची सूक्ष्म तपासणी करण्याची पद्धत त्यांनी विकसित केल्याने त्यांच्या ‘ऑटो शिल्ड’ला पेटंट मिळाले आहे.

Auto Shield Assurance Startup give all information of second hand vehicle
Chatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंनी घेतील शिंदे-फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

तीन शहरातून अगोदर सुरवात

‘ऑटो शिल्ड ॲशुरन्स’च्या माध्यमातून मुंबई, पुणे, बंगळुरू या महानगरातून सेवेला सुरवात झाली आहे. आता तीन महिन्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह टायर टु शहरात सेवा सुरु केली जाणार आहे. यात ग्राहकाला पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रीक अशा सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी यातून करता येईल. ग्राहकाला ही सेवा माफक दरात दिली जात आहे.

३०० पेक्षा जास्त पॅरामीटर्स

‘ऑटो शिल्ड ॲशुरन्स’च्या माध्यमातून वाहन घ्यायचे असल्यास तुम्हाला https://autoshield.co.in/ वेबसाईटवर जावे लागले तसेच त्यांच्या कस्टमर्स केअर सर्व्हीसला कॉल केल्यानंतर त्यांचा तज्ज्ञ व्यक्ती तुमच्याकडे येईल. कोणते वाहन विकत घ्यायचे आहे हे दाखविल्यानंतर त्याची तपासणी केली जाते.

यामध्ये वाहनाचे सर्व पार्ट चेक केले जातात. बॉडी पेंट हे मीटरने चेक केले जाते. इलेक्ट्रीक फॉल्ट तपासणीसाठी ओबीडी स्कॅनिंग केली जाते. इंजिन हेल्थ ऑईल क्वॉलीटी, मीटरच्या सहाय्याने ब्रेक टेस्टींग, संपूर्ण इंजिनची स्टेथोस्कोपच्या माध्यमातून तपासणी केली जाते. टायर डेप्थ मीटर, एसी, ओडोमीटरमध्ये काही छेडछाड करुन त्याची रिडींग कमी केली असल्यास,

सर्व इलेक्ट्रीक सिस्टीम अशा ३०० पॅरामीटर्समध्ये तपासणी केल्यानंतर वाहन घेणाऱ्यांना एका तासात ओरिजनल, रिपेन्टेड, स्क्रॅच, डमेज अशा विविध मुद्यांची माहिती असलेला रिपोर्ट दिला जातो. यामध्ये प्रत्येक घटकाला रेटींग दिली जाते. त्यामुळे हे वाहन विकत घेणाऱ्याला सर्व प्रकारची माहिती मिळते. यातून फसवणूक टाळता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.