BAMU University : कुलगुरूंविरोधात थेट कुलपतींकडे तक्रार ; सत्काराची फुले सुकण्याआधीच प्र-कुलगुरूंना हटविल्याने संताप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांना अवघ्या दोनच दिवसांत पदावरून हटविल्याने नवनियुक्त कुलगुरूंच्या विरोधात थेट कुलपतींकडेच लेखी तक्रार करण्यात आली असून, कुलगुरूंना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
bamu university
bamu university sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांना अवघ्या दोनच दिवसांत पदावरून हटविल्याने नवनियुक्त कुलगुरूंच्या विरोधात थेट कुलपतींकडेच लेखी तक्रार करण्यात आली असून, कुलगुरूंना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, कुलगुरूंनी हा निर्णय ‘मजबुरी’ने घेतल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या निर्णयावर अधिसभा सदस्य संजय कांबळे यांनी आक्षेप घेतला आहे. कांबळे यांनी सांगितले, की कोल्हापूर ही शाहूची भूमी आहे. तेथून डॉ. आंबेडकरांच्या भूमीत आलेल्या फुलारी यांचा हा निर्णय या विद्यापीठात चुकीचा पायंडा पाडण्यासारखे आहे. भाजप व संघाचा गुप्त अजेंडा म्हणजे कर्मठ हिंदुत्ववाद आणण्याचे प्रयत्न कुलगुरूंच्या माध्यमातून होत आहे. डॉ. फुलारी यांच्यावर भाजपचा दबाव असून, त्यातून डॉ. सरवदे यांना कार्यमुक्त केले. त्यामुळे अशा कुलगुरूंकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. राजकीय पक्षासाठी काम करणाऱ्या कुलगुरूंना कार्यमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू.

bamu university
Sambhaji Nagar : कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार ; सावंगी बायपासवरील घटना,कारचालक फरारी

कुलगुरूंच्या अडचणी वाढणार

डॉ. फुलारी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत कालपासून माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क करीत आहेत. परंतु ते किंवा विद्यापीठातील व्यवस्था कोणताही प्रतिसाद देत नाही. व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने म्हणाले, ‘‘डॉ. सरवदे यांच्या नियुक्तीला आमचा विरोध होता. त्याला आक्षेप घेतल्यावर, कुलगुरूंनी ही नेमणूक म्हणजे माझी मजबुरी असल्याचे म्हटले होते. आता निवड रद्द केल्यावरही माझी मजबुरी असल्याचे ते म्हणत आहेत. त्यांनी कोणती मजबुरी आहे, हे जाहीर करावे. कुलगरूंच्या या निर्णयामुळे त्यांच्या कार्यक्षमतेविषयी शंका निर्माण होत आहेत.’’

bamu university
BAMU University : गुणवत्तेशी तडजोड ! 'बामू’ने ३३ महाविद्यालयांना नाकारली 'एनओसी'

प्रभारी प्र-कुलगुरू नियुक्तीचा निर्णय घेताना एक त्रुटी राहिली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम १३ मध्ये राज्य सरकारने दुरुस्ती केली आहे. त्यानुसार प्र-कुलगुरूपदाच्या नियुक्तीला व्यवस्थापन परिषदेत मान्यता घेण्याची तरतूद आहे. परंतु प्रभारी प्र-कुलगुरू नेमताना जुन्या कायद्यातील १० (क) रद्द झाला की नाही, याची जाणीव प्रशासनाला नसावी. निवडीमध्ये एखादी त्रुटी राहू नये म्हणून स्थगिती देण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेत हे चित्र स्पष्ट होईल.

- डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.