बँकेने कर्जवसुलीची नोटीस पाठवली अन् आमचा ‘बाप’ गेला; हृदयद्रावक घटना | Farmer News

शेतात विष घेऊन बळिराजाची आत्महत्या, बँकेच्या नोटिशीमुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप
Farmer News
Farmer NewsSakal
Updated on

वैजापूर : शेती व शेतकऱ्यांवरील संकटे अधिक वाढत आहेत. यंदाही शेवटपर्यंत कपाशीला भाव मिळाले नाही. अवकाळी पावसामुळे कांद्याचा चिखल बनला. त्यात बँकेकडून कर्ज वसूलीसाठी पाठवलेल्या नोटिसमुळे व्यथित झालेल्या तालुक्यातील सवंदगाव शिवारातील एका शेतकऱ्याने रविवारी (ता.७) शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बँकेच्या नोटिसमुळे आमच्या वडिलांनी धास्तीपोटी आत्महत्या केल्याच्या आरोप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दत्तू मुरलीधर अदमाने ( वय ५५), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अदमाने हे सवंदगाव शिवारातील (गट क्र २०३) मध्ये राहत होते. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. खरीप हंगामात कपाशीचे पीक घेतले. मात्र, भाव न मिळाल्याने कपाशीवर केलेला खर्चही निघाले नाही. रब्बी हंगामात कांदे लावले. परंतु अवकाळी पावसामुळे कांद्याचा चिखल झाला. दरम्यान, खरीप बरोबर रब्बी हंगामातही पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नाही.

Farmer News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रचंड नुकसान सहन करावे लागले. अशात भारतीय स्टेट बँकेतून २ लाख ७४ हजार घेतलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी बॅंकेकडून तगादा सुरु होता. ३० एप्रिल रोजी लोकअदालतमध्ये रक्कम भरण्यासाठी बॅंकेने अदमाने यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे रक्कम परतफेड कशी करायची या चिंतेत ते होते. बॅंकेची रक्कम परतफेड करण्यासाठी त्यांनी सावकारी कर्ज मिळावे यासाठी त्यांनी अनेक सावकारांकडे चकरा मारल्या.

पण सातबाऱ्यावर अगोदरच बोजा असल्याने त्यांना नवीन कर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे ते खचले होते. त्यामुळे दत्तू अदमाने यांनी रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली.

Farmer News
गुजरातमधून 40 हजार मुली कुठं गेल्या? सामना अग्रलेखातून भाजपला खडा सवाल | Saamana Editorial

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत दत्तू अदमाने यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या कुटुंबाने बॅंकेच्या वसुली तगाद्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरु केली आहे.

कर्ज घेतल्यानंतर ते फेडावेच लागते, कर्ज माफ होत नसते. ३० तारखेला जी नोटीस पाठविली होती. शेतकऱ्याच्या सवलतीसाठी थकीत कर्ज तडजोड करण्याविषयी होती.

- अतुल पांडे (व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, वैजापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.