CK Nayudu Trophy : संभाजीनगरात ‘बीसीसीआय’चे सामने, १० वर्षांनंतर मराठवाड्यात आंतरराज्यीय क्रिकेट स्पर्धा

दहा वर्षांनंतर मराठवाड्यात आंतरराज्यीय क्रिकेट स्पर्धा
Cricket Ground
Cricket Groundsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर शहरातील एन-२ च्या एडीसीए मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) डिसेंबरमध्ये ‘कूच बिहार करंडक’ आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ‘सी. के. नायडू करंडक’चे सामने खेळवले जाणार आहेत. यापूर्वी शहरात दहा वर्षांपूर्वी दिलीप करंडकचा सामना झाला होता.

बीसीसीआयतर्फे १९ वर्षांखालील वयोगटात कूच बिहार करंडक व २३ वर्षांखालील वयोगटात सी. के. नायडू करंडक या स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर शहरातील मैदानावर खेळल्या जाव्यात यासाठी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी राज्य क्रिकेट संघटनेकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता.

दरम्यान, एन -२ च्या एडीसीए मैदानावर डिसेंबरमध्ये कूच बिहार करंडक तर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सी. के. नायडू करंडकचे सामने खेळले जाणार आहेत. यामुळे शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील क्रिकेट खेळाडू व प्रेमींना एक मोठी संधी निर्माण झाली आहे. या सामन्यांमुळे शहरातील क्रिकेटला एक नवसंजीवनी मिळणार असून, यात उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

शहरात या अगोदर दिलीप करंडक सामना खेळविण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनंतर हे सामने होत आहेत. यामुळे शहरात उदयोन्मुख खेळाडूंना बाहेरील खेळाडूंचा खेळ जवळून पाहता येणार आहे; तसेच यापुढेही संघटनेच्या वतीने मोठे सामने घेणे घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे

- सचिन मुळे, सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना

आंतरराज्यीय सामन्यांमुळे शहरातील क्रिकेट संस्कृती सुधारते. यात बीसीसीआयच्या या सामन्यांमुळे शहरात आयपीएल आणि २० टी २०, रणजीच्या सामने आयोजित करण्याचे दरवाजे उघडले आहेत. या ऐतिहासिक शहरात विमानतळ, ५ स्टार हॉटेल्स, मैदाने उपलब्ध आहे, यामुळे असे सामने दरवर्षी व्हावेत.

- दिनेश कुंटे, माजी जिल्हा कर्णधार.

आपल्या शहरात सगळ्या सोयी-सुविधा आहेत; तसेच सामने आयोजन करण्यासाठी लागणारा अनुभव व मोठी यंत्रणा उभी आहे. या सामन्यानिमित्त बाहेरील खेळाडूंचा खेळ नवीन होतकरू खेळाडूंना जवळून पाहता येणार आहे. यात खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम व प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्थेचा विचार करण्यात यावा.

- अनंत नेरलकर, माजी रणजीपटू.

असे होणार खेळ

  • कूच बिहार करंडक (१९ वर्ष) १५-१८ डिसेंबर - महाराष्ट्र विरुद्ध बडोदा

  • सी. के. नायडू करंडक (२३ वर्ष) २१-२४ जानेवारी - महाराष्ट्र विरुद्ध आसाम

  • सी. के. नायडू करंडक (२३ वर्ष) ११-१४ फेब्रुवारी - महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.