Aurangabad : रोषणाई, आतषबाजी करताना घ्या खबरदारी

विद्युत रोषणाई करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे
Electric Lighting Firecrackers
Electric Lighting Firecrackers
Updated on

औरंगाबाद : दिवाळीची लगबग सुरू झाली असून, या काळात विद्युत रोषणाई करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणची लघुदाब व उच्चदाबाच्या वीज वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघडयावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून अंतर ठेवावे.

फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीज यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र किंवा फिडर पिलरशी टाकलेल्या कचऱ्याजवळ फटाके फोडू नये. किंवा तो कचरा पेटवून देण्याचे प्रकार टाळावेत. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्याची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्रीकरून घ्यावी. या विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होतो. घर किंवा इमारतीच्या अर्थिंगची तपासणी करून घ्यावी.

थेट साधा संपर्क

वीज यंत्रणेला आग लागल्यास किंवा धोका निर्माण झाल्यास, वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या चोवीस तास सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या क्र. १८००२३३३४३५, १८००२१२३४३५, १९१२, १९१२० या क्रंमाकांवर किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

आकाशदिवा लावताना घ्या काळजी

घराबाहेर आकाश दिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा. तसेच तुटलेली वायर चागंल्या दर्जाच्या इंन्सुलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर वातीचे दिवे लावावेत. विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नका. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा त्यापासून धोका होईल, असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()