'कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळासह सज्ज राहा'

covid 19 coronavirus
covid 19 coronavirus
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोवीड संसर्गाचे (Covid Infection)गंभीर रुग्ण बरे करण्याची महत्वपूर्ण कामगिरी घाटी रुग्णालयाने यशस्वीपणे पार पाडली. त्याच पद्धतीने आता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पर्याप्त स्वरुपात उपचार यंत्रणा प्रशिक्षित मनुष्यबळासह तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (IAS Sunil Chavan) यांनी मंगळवारी (ता. तीन) दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोवीडमुळे (Covid19) झालेल्या मृत्यूच्या विश्र्लेषणाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी औद्योगिक सामाजिक दायित्व (सीएसआर) बाबत आढावा घेत सूचना केल्या. कोवीडच्या आगामी लाटेसाठी आरोग्य सेवा, जिल्हा परीषद, महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सिग स्टॉफ व इतरांना प्रशिक्षण द्यावे. औषधशास्त्र विभागाने औषध बॅंक तयार करावी त्यात विविध संस्था तसेच मान्यवरांकडून देणगी स्वरुपात मिळालेली औषधे स्विकारण्यात यावीत आदी सुचना त्यांनी दिल्या.

covid 19 coronavirus
जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

...तर मृत्यू रोखता येईल : डॉ. कानन येळीकर

घाटीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१. ६० टक्के व मृत्यूचे प्रमाण २९. ९० टक्के इतके आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह इतर जिल्ह्यातून रुग्णांची तब्येत अधिक खालावल्यानंतर घाटीत गंभीर स्थितीत रुग्ण पाठवण्याचे प्रमाण अधिक आहे. जर संबंधित रुग्णालयाने रुग्णाला वेळेत प्रकृती नियंत्रणात असताना घाटीत पाठवल्यास रुग्णांचा मृत्यू अधिक प्रमाणात रोखणे शक्य होईल. यावेळी कोवीड मृत्यू विश्र्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी यांनी कोवीडमुळे विषाणू बाधित मुळे झालेल्या मृत्यूची विश्र्लेषणाबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी कोवीड-१९ मध्ये केलेल्या रुग्णसेवा व पुढील कोवीडची तिसऱ्या लाटेसाठी प्रतिबंध यावर सादरीकरण केले. यात घाटीत आलेल्या गंभीर रुग्णाच्या मृत्यूची कारणे इतर रुग्णालयांनी घाटीकडे रुग्ण पाठवण्यामागची कारणे, मृत्यू प्रमाण कमी होण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत माहिती दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. मंगेश गोंदावले, अतिरीक्त जिल्हाधिकारी, अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, क्ष-किरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे, औषधवैद्यक विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, शरीरविकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. सुधीर चौधरी, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.