बीड जिल्ह्यात अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही तडाखा; नद्यांना पाणी, पिकांचे नुकसान

धारुर, केज, परळी व वडवणी तालुक्यातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार वादळ व पाऊस झाला.
किल्लेधारुर (जि.बीड) : वादळामुळे वीज रोहीत्र उन्मळून पडले.(छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)
किल्लेधारुर (जि.बीड) : वादळामुळे वीज रोहीत्र उन्मळून पडले.(छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)किल्लेधारुर (जि.बीड) : वादळामुळे वीज रोहीत्र उन्मळून पडले.(छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)
Updated on

बीड : जिल्ह्यात (Beed) दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा (Untimely Rain) तडाखा बसला. धारुर (Killedharur), केज (Keij), परळी (Parli Vaijinath) व वडवणी (Wadwani) तालुक्यातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार वादळ व पाऊस झाला. रविवारी (ता. नऊ) दुपारी धारुर तालुक्यातील भोगलवाडी, चोंडी, सोनीमोहा, थेटेगव्हाण आदी भागांत विजांच्या कडकडाट (Thunderstorm) मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी विजेचे खांबही पडले. तर, घरांसमोरील छत, झाडे उन्मळुन पडली. पावसाळ्याप्रमाणे नदी-नाल्या खळखळुन वाहिल्या. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारीही तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासह केज व परळी तालुक्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. (Beed Rain Updates Second Day Untimely Hit District, Rivers Flow)

किल्लेधारुर (जि.बीड) : नद्या - ओढे असे खळखळून वाहिले.
किल्लेधारुर (जि.बीड) : नद्या - ओढे असे खळखळून वाहिले. किल्लेधारुर (जि.बीड) : नद्या - ओढे असे खळखळून वाहिले.
किल्लेधारुर (जि.बीड) : वादळामुळे वीज रोहीत्र उन्मळून पडले.(छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)
चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी, दोघांचाही बुडून मृत्यू

सिरसाळासह परिसरात या आठवड्यात दुसऱ्यांदा वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळी बाजरी, ज्वारीच्या कडबा, भुईमूग या पिकासह आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. कानडी शिवारात आंब्याचे झाडांचे फाटे उन्मुळुन पडली. आज रविवारी सकाळपासून काळेकुट्ट ढगाळ वातावरण बनले होते. दुपारी बारा दरम्यान जोरदार वारा, विजेचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास हा पाऊस झाला.

किल्लेधारुर (जि.बीड) : शेतात मल्चिंग केलेले मिर्चीची झाडेही उखडून पडली. (छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)
किल्लेधारुर (जि.बीड) : शेतात मल्चिंग केलेले मिर्चीची झाडेही उखडून पडली. (छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)किल्लेधारुर (जि.बीड) : शेतात मल्चिंग केलेले मिर्चीची झाडेही उखडून पडली. (छायाचित्र : प्रकाश काळे/ईश्‍वर खामकर)

अचानक आलेल्या पावसाने शेतकरी, ग्रामस्थांची धांदल उडाली. उन्हाळी पिकांसह, विटभट्टी चालकांचे नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. आंब्यासह इतर फळपिकांचे नुकसान झाले. आज सकाळी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील भाजीपाल्यासह पिकांचे व विटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()