आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद : कोरोना Corona जागतिक महामारीच्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरणदृष्ट्या लाभदायी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण District Collector Sunil Chavan यांनी सांगितले. उद्या सोमवारी (ता.२१) सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची International Yoga Day जनजागृती करण्यासाठी आज रविवारी (ता.२०) सकाळी ७ वाजता क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सायकल फेरीच्या समारोप प्रसंगी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे देखील सायकल फेरीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे Aurangabad District Cycle Association अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरण सिंग संगा, सहसचिव अतुल जोशी, स्केटिंग अकॅडमीचे भिकन आंबे, योग आणि स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वाणी, क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेशचे उदय कहाळेकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. Before International Yoga Day Awareness Cycle Rally In Aurangabad
जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले, की सायकल फेरीत सहभागी होताना आनंद होत आहे. फेरीच्या माध्यमातून खेळाडूंनी स्वच्छतेचा, योग करण्याचा, पर्यावरण जनजागृतीचा जो संदेश दिला आहे. ज्या घोषणा दिला आहे, त्या प्रत्यक्ष साकार करणेही आवश्यक आहे. सोमवारी (ता.२१) विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. तिथे गर्दी करण्यापेक्षा आहे तिथून योग करून त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ पाठवावेत. त्यामधून उत्कृष्ट पद्धतीने योग सादर करणाऱ्यांना बक्षिसे दिली जातील, असे श्री.चव्हाण म्हणाले. सायकल फेरीच्या समारोप प्रसंगी दिवंगत ऑलम्पिक पदक विजेते धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ड्रॉ पद्धतीने सायकल फेरीतील उत्कृष्ट सायकलपटूचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून अनुक्रमे उमेश मारवाडी, अश्विनी जोशी, सोनम शर्मा या विजेत्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने सायकल फेरीचा समारोप झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.