Yogendra Yadav : मते कापणाऱ्यांपासून सावध व्हा : योगेंद्र यादव

Yogendra Yadav : छत्रपती संभाजीनगर येथे योगेंद्र यादव यांनी भारतीय लोकशाहीच्या आव्हानांवर चर्चा करताना मत कापणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. देश वाचवण्यासाठी राजकीय आणि वैचारिक लढाईची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Yogendra Yadav
Yogendra Yadav sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘राजकारणातून देश तोडण्याचे षड्‍यंत्र होत असेल तर त्यावर उपाय राजकारणातूनच मिळेल. त्यामुळे देश वाचवण्याचे राजकारण आम्ही करीत आहोत.

मत कापण्याचे जे काम करतील त्यांच्यापासून सावध राहा, लोकशाही वाचवायची असेल तर रोज वैचारिक लढाई लढावी लागेल’’, असे स्वराज इंडियाचे संस्थापक, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणाले.

‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ याविषयावर रविवारी (ता. १३) मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे चर्चासत्र भारत जोडो अभियान, महाराष्ट्र डेमॉक्रॅटिक फोरम, संविधान बचाव देश बचाव अभियान, मुस्लिम सोशल फोरम यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी जिल्हा न्यायाधीश ॲड. प्रकाश परांजपे होते.यादव म्हणाले, ‘‘हा देश अल्पसंख्याकांचा देश आहे. अल्पसंख्याक वाचणे ही देश वाचण्याची पहिली अट आहे. आज त्यांना धोका आहे. हा देश आतापर्यंत अशिक्षित लोकांनी वाचवला. धोका आतून आहे. धोका सत्तेपासून आहे.

त्यामुळे त्यांच्याशीच लढावे लागेल.’’ यावेळी प्रा. अजित झा, प्रा. नदीम खान, उल्का महाजन, मुजताबा फारूख, ॲड. वैशाली डोळस, शेख मुजीब, ललित बाबर, सुभाष लोमटे, प्रा. जयदेव डोळे यांनी विचार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.