डॉ.भागवत कराड हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या चिखली गावातील रहिवासी आहेत.
औरंगाबाद : गेल्या वर्षी १८ मार्च रोजी औरंगाबाद महानगरपालिकेचे Aurangabad Municipal Corporation माजी महापौर डॉ. भागवत कराड Union Minister Bhagwat Karad यांची भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. ही निवड अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. डॉ.कराड यांनी २२ जुलै २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने औरंगाबाद Aurangabad शहराला राज्यसभेतील खासदारपद मिळाले आणि केवळ वर्षभराच्या आतच केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. १६ जुलै १९५४ या वर्षी त्यांचा जन्म झाला. डॉ.भागवत कराड हे मूळचे लातूर Latur जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या चिखली गावातील रहिवासी आहेत. bhagwat karad journey from corporator to union minister in modi cabinet
त्यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि वैद्यकीय सेवा औरंगाबाद शहरातच सुरू केली. डाॅ. कराड हे १९९५ ते २०१० या १५ वर्षांच्या काळात औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक होते. या काळात त्यांनी शहराचे दोन वेळा महापौरपद भूषवले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. भाजप पक्ष पातळीवर त्यांनी काम केले आहे. त्यात भाजप राज्य कार्यकारिणीचे ते उपाध्यक्ष होते. दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठवाड्यातील ओबीसी समाजातील एक अभ्यासू, उच्चशिक्षित नेता म्हणून डाॅ. भागवत कराड यांची ओळख आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.