'त्या'आक्षेपार्ह जाहिरातीविरोधात भाजप आक्रमक, माफी मागावी म्हणत केले आंदोलन

'त्या'आक्षेपार्ह जाहिरातीविरोधात भाजप आक्रमक
BJP Agitation In Aurangabad
BJP Agitation In Aurangabad esakal
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी दिलेल्या जाहिरातीत ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर छापून आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. चेतन कांबळे यांच्याविरोधात भाजप (BJP) व ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. आज औरंगाबाद (Aurangabad) येथील क्रांती चौकात कांबळे यांनी दिलेली आक्षेपार्ह जाहिरातीची होळी करत निदर्शने केली. या प्रसंगी कांबळे यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. (Bharatiya Janata Party Agitation Against Shiv Sena Former Corporator In Aurangabad)

BJP Agitation In Aurangabad
मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही : सुभाष देसाई

चेतन कांबळे यांनी जाहिरातीत शेंडी, जानवे हटाव अशा विषयाचा मजकूर छापला आहे. यावर आक्षेप भाजपने घेतला असून भाजप आध्यात्मिक आघाडीचे संजय जोशी, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली सदरील निदर्शने करण्यात आली. ही जाहिरात शिवसेनेने छापली असून ब्राह्मण व इतर समाजाच्या विरोधात असल्याचे सिद्ध केले.

BJP Agitation In Aurangabad
मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

चेतन कांबळे यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांनी शब्द मागे घेत ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी अमृता पालोदकर, गीता आचार्य, सविता कुलकर्णी, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, जालिंदर शेंडगे, राजेश मेहता, रामेश्वर भादवे यांच्यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.