Raosaheb Danve : अजित पवार आल्याचा नव्हे, ठाकरे गेल्याचा भाजपला फटका!

लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला, असे विधान माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजक रावसाहेब दानवे यांनी केले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार, असे मनोज जरांगे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्यावे. या तिघांनी त्यांच्या जाहीरनाम्यातही तसा उल्लेख करावा, असे आव्हानही दानवे यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.