BJP Sambhaji Nagar: "आता कुठल्या राज्यातील सरकार पडणार?" संभाजीनगरमध्ये आमदार डांबल्याची अफवा

BJP Sambhaji Nagar News: हॉटेलबाहेरील पोलिस बंदोबस्तामुळे राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदलावेळी झालेल्या घटनेची आठवण सर्वांना झाली. आता कुठल्या राज्यातील सरकार पडणार, अशी चर्चा दिवसभर सुरू होती.
BJP Sambhaji Nagar
BJP Sambhaji NagarEsakal
Updated on

परराज्यात सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे तेथील आमदार शहरात आणण्यात आले. कोकणवाडीतील हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून बाहेर तगडा बंदोबस्त आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची अफवा दिवसभर मराठवाड्यात सुरू होती.

एक दिवस आधीपासूनच शुक्रवारी रात्री यातील काही आमदार आले. यासह काही विमानाने शहरात आले. त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात हॉटेलात आणण्यात येत होते. यानंतर हॉटेलमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही सामावेश होता. हॉटेलबाहेरील पोलिस बंदोबस्तामुळे राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदलावेळी झालेल्या घटनेची आठवण सर्वांना झाली. आता कुठल्या राज्यातील सरकार पडणार, अशी चर्चा दिवसभर विविध माध्यमे आणि नागरिकांत सुरू होती.

परंतु, छत्तीसगडचे महामंत्री राम भारती, माजी खासदार प्रदीप गांधी यांनी ही संघटनात्मक बैठक असल्याचे स्पष्ट केल्याने या सर्व केवळ अफवाच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले.

छत्तीसगडचे पदाधिकारी का?

भाजप लढणार असणाऱ्या मराठवाड्यातील २५ जागांवर प्रत्येकी एक याप्रमाणे २५ प्रवासी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत हे कार्यकर्ते त्यांना मिळालेल्या मतदारसंघात काम करतील. लोकसभेत छत्तीसगड येथून ११ पैकी १० जागांवर विजय मिळाला आहे. तिथले संघटन शक्तिशाली असल्याने मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात झालेला सपाटून पराभव, ठाकरे गटाचे आव्हान आणि काँग्रेस यामुळे भाजपने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठवाड्यातील २५ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांची जबाबदारी छत्तीसगडच्या प्रवासौ कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ३१) शहरातील कोकणवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये स्थानिक पदाधिकारी आणि छत्तीसगड येथून आलेल्या आमदार, खासदार यांची बैठक पार पडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिथले संघटन शक्तिशाली असल्याने मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

लोकसभेत आलेले अपयश, त्यात मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा, बदलापूरची घटना यावरून लोकांचा भाजपवर वाढता रोष, विरोधकांची आक्रमक आंदोलने, त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे भाजप काहीसा बॅकफुटवर गेला आहे.

BJP Sambhaji Nagar
Devendra Fadnavis : राखीची आण आहे ; फडणवीस

असे असताना विरोधी पक्ष मात्र मजबूत होत आहेत. हे लक्षात घेता दोन महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली आहे.

याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील आजी-माजी आमदार, खासदार यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय चिटणीस रवींद्र मेनन, आंध्र प्रदेशचे संघटनमंत्री एन. मधुकर, छत्तीसगडचे महामंत्री राम भारती यांच्यासह २५ पदाधिकारी आणि स्थानिक नेतेही उपस्थित होते.

BJP Sambhaji Nagar
Imtiaz Jaleel On MVA: "तुमच्यामुळे पडलो म्हणू नका," महाविकास आघाडीचा प्रतिसाद नाही, जलील यांचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.