जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

भाजप
भाजप
Updated on

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister Of State For Fianance Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली परळीहून निघालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी (ता.२०) औरंगाबादेत (Aurangabad) आली असता, हजारोंच्या संख्येने भाजप (BJP) कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. जनआशीर्वाद यात्रेचे (Jan Ashirwad Yatra) पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी क्रेन लावून स्वागत केले होते. यात्रेच्या माध्यमातून भाजपने शहरभर मोठे शक्तिप्रदर्शन केल्याने चौकाचौकात एकच गर्दी उसळली होती. केंब्रिजपासून निघालेल्या यात्रेत युवा मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या वाहन फेरीतही मोठी गर्दी झाली होती.

भाजप
World Vadapav Day 2021 : मुंबई वडापाव बनवा घरी, ही आहे रेसिपी

कुठे किती गुन्हे?

यात्रेतील गर्दी प्रकरणी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १० पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रांती चौक पोलिस ठाण्यात पवन सोनवणे, सिद्धार्थ साळवे, कचरु घोडके यांच्यासह इतरांवर तसेच सिटी चौक पोलिस ठाण्यात अनिल मकरिये, दयाराम बसैये, जगदीश सिद्ध, राजगौरव वानखेडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. छावणी पोलिसांत प्रशांत तारगे, दीपक ढाकणे, कैलास वाणी तर वेदांतनगर पोलिसांत सुनील सोनवणे, संतोष बरंडवाल, जवाहरनगर पोलिसांत जालिंदर शेंडगे, अक्षय म्हात्रे, चंद्रकांत हिवराळे, तसेच मुकुंदवाडी पोलिसांत सुनील जाधव, प्रमोद राठोड, दीपक खोतकर, अतुल घडामोडे, किसन ठुबे, एमआयडीसी पोलिसांत गोपीनाथ वाघ, राजू शिंदे, रवी कवडे, संजय चौधरी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बाळासाहेब मुंढे, सुदाम साळुंके, विवेक राठोड, राजाभाऊ जाधवर, लक्ष्मीकांत थेटे, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अरविंद डोणगावकर, शेख सलीम यांच्यासह दौलताबाद ठाण्यात शेख बने शेख हुसेन, प्रकाश रुपेकर, शिवशंकर मानकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.