Ch. Sambhaji Nagar : ठाकरे स्मारकाचे अडीच वर्षांत अर्धेच काम

प्रशासकांनी केली पाहणी : फोटो गॅलरीचे लवकरच सादरीकरण
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक विकसित करण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची १८ महिन्यांची मुदत होती. मात्र, तब्बल अडीच वर्षांत केवळ ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या पाहणीत समोर आले. दरम्यान, म्यूझियममध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे कोणकोणते छायाचित्र असावे, याचे सादरीकरण आगामी दोन दिवसांत दिल्लीच्या डीएफआय एजन्सीकडून केले जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने २६ कोटींचा निधी दिला. निधी उपलब्ध असतानाही प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराला मार्च २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले होते, आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी चार महिन्यांपूर्वी याठिकाणी अतिरिक्त कामे सुचवली होती. या कामांच्या वाढीव खर्चाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार बुधवारी (ता. चार) जी. श्रीकांत यांनी कामाची पाहणी केली. शहर अभियंता ए. बी. देशमुख, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसिफ उपस्थित होते.

sambhaji nagar
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

स्मृतिवनमधील झाडांसाठी दररोज एक लाख लिटर पाणी लागत असल्याने एसटीपी प्लांट तयार करावा, वृद्ध, गरोदर माता, दिव्यांग व्यक्तींना फिरण्यासाठी दोन ई-रिक्षा ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तलाव खोल करून कायमस्वरूपी पाणी राहील याची व्यवस्था करावी. तलावामध्ये मासे, कासव सोडावे, पाथवेचे सौंदर्यीकरण करावे, म्यूझियमचा लोगो तयार करावा, अशा सूचनांचा यात समावेश आहे. दिल्लीच्या डिझाइन फॅक्टरी ऑफ इंडिया एजन्सीकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्यावर आधारित म्यूझियमदेखील साकारले जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना देखील सादरीकरण दाखवून त्यानुसार बदल केला जाईल.

sambhaji nagar
Sangli : बेडगमध्ये आंबेडकरांची पाडण्यात आलेली कमान 'या' मार्गावर उभारणार; महेश कांबळेंनी दिली महत्त्वाची अपडेट

दोन दिवसांत उघडणार पुतळ्याची निविदा

याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा ५१ फुटी उंचीचा पुतळा बसविला जाणार आहे. ब्रांझ धातूचा हा पुतळा असून, या कामाची निविदा आगामी दोन दिवसांत उघडली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता आर. पी. वाघमारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.