Latest Maharashtra News: डॉ. प्रतिक्षा आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी ती रुग्णालयाच्या ऑपरेशन थिअटरमध्ये होती. त्यावेळी आरोपीने पीडितेला वारंवार फोन केले.
ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर प्रतिक्षाने आरोपीला फोन केले, मात्र त्याने तिचे कॉल घेतले नाही. त्यानंतर पीडितेने त्याला मेसेज टाकून हा शेवटचा असल्याचे सांगितले व आत्महत्या केली.(Latest Marathi News)
दरम्यान, आरोपी पती प्रितम शंकर गवारे (२६, रा. करंजखेडा ता. कन्नड ह.मु. प्रफुल्ल हौ.सो. बजरंगचौक) याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. जवळगावकर यांनी दिले.
या प्रकरणी रविवारी प्रतिक्षाचे वडील प्रकाश बाबुराव भुसारे (रा. देवानगरी) यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. प्रितम याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी दुपारी प्रितम गवारे याला बेड्या ठोकल्या. प्रतीक्षाने आत्महत्या केली होती.
त्यावेळी आरोपी हा शहरातच असल्याचे समोर आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाज यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपीने प्रतिक्षाला मॅसेज व कॉल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्याचा मोबाइल हस्तगत करायचा आहे. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे. प्रतिक्षाला आरोपींनी हुंडास्वरुपात पैशांची मागणी असून यात कोणाचा सहभाग आहे याचाही तपास करायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.