Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, बिडकिनमध्ये नागरीक हैराण

Marathwada: नागरिकांसह वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत, जलवाहिनीच्या कामाने वाहनधारकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप..
sakal
Cha Sambhajinagar: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, बिडकिनमध्ये नागरीक हैराण
Updated on

रविंद्र गायकवाड

Sambhajinagar: नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. बिडकिन परिसरातील निलजगाव फाटा ते शेकटा फाटा या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत.

पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार असल्याचा संकेत मिळत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे तात्पुरती मलमपट्टी करुन बुजवून रस्त्याचा वाहनधारक व नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुरळीत करावा नंतर काही दिवसांनी नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांना केली आहे.

sakal
Cha. Sambhaji Nagar: बिडकिन येथील जिल्हा बँक फोडण्याचा केला प्रयत्न... वाचा पुढे काय झाले?

बिडकिन- पैठण - छत्रपती संभाजीनगर - शेकटा या मार्गावरील निलजगाव फाटा ते शेकटा फाटा मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले असुन चिखलमय खड्डेच खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस तात्पुरती मलमपट्टी करुन करण्यात येते, आणि प्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होऊन चिखलमय तयार होत आहेत.या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरळीतपणे सुरूच असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

मुंबई,पुणे, नाशिक , उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदींसह इतर राज्यातून जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत तर सर्व रस्ता हा खड्ड्यात बुडाला असुन चिखलमय तयार झाला आहे.. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक व रेती ,खडी, मुरुम,माती वाहुन नेणारे हायवा व मिनी ट्रक सतत जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे.

sakal
Lalbaug Cha Raja Visarjan: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ; काही दृष्टिमोहक क्षण !

मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि खड्डे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने व खड्ड्यात चिखल तयार झाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्‍यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे.

जड वाहतूक दिवस रात्र सुरू राहिल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे. फारोळा व निलजगाव फाटा परिसरातील उंच पुलाचे बांधकाम कंत्राटदारांनी मागील काही महिन्यांपासून सुरू केले असुन मोठ्या कासवगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या पुलावरून जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका कमी होईल तर वाहतुकीची कोंडी हि निर्माण होणार नाही.

म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल नियोजित कंत्राटदार यांना याबाबत सुचना द्याव्यात.या पुल, रस्ता व जलवाहिनी चे काम तातडीने पूर्ण करावे.तसेच रोडवरील व इतर मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांच्या वतीने होत आहे.

sakal
Lalbaug Cha Raja Visarjan: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ; काही दृष्टिमोहक क्षण !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.