TET Exam Scam : सत्ताधाऱ्यांनी आता शांत रहावं; टीईटी घोटाळा प्रकरणावर खैरेंचा टोला

टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा, या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहीजे असे सत्तार म्हणालेत
khaire
khairekhaire
Updated on

Abddul Sattar TET Exam Scam Case : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) घोटाळा प्रकरणात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नाव समोर आले आहे. यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्ताधाऱ्यांसह अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत खोचक टोला लगावला आहे. “सत्तारांनी आता शांत राहवं, उगाच बडबड करू नये”, असा टोला खैरेंनी सत्तारांना लगावला आहे.

khaire
Patra Chawl Case : संजय राऊतांना मोठा झटका, 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी

टीईटी घोटाळ्यासंदर्भात सत्तारांची मुलाखत पाहिली. त्यांच्या अनेक शाळा असून, या घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी केली आहे. ही चौकशी करतच ते सिल्लोडपर्यंत पोहोचले आहेत. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शाळा त्यांचीच आहे. त्यामुळे फक्त त्यांच्याच मुलींचे नावे आहेत, की आणखी मुलींचाही यात समावेश आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे” अशी मागणी खैरे यांनी केली आहे.

khaire
मंत्रिमंडळाचा पेच अखेर सुटला! उद्या होणार शपथविधी

टीईटी घोटाळा प्रकरणावर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण

टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा, या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहीजे असे सत्तार म्हणालेत. माध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्याकडे काल दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिलं की कोणीतरी खोटी बातमी चालवत असल्याचे म्हटले आहे. कोणीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर कायदेशीर कारवाई आपण करणार असल्याचेही अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

khaire
...तर मग उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल; अब्दुल सत्तार यांचा थेट इशारा

सरकार माझं नाहीये, मी सरकारमध्ये एक आहे, मी मुख्यमंत्र, मंत्री किंवा पंतप्रधान कार्यालयातील कोणी अधिकारी असतो तर स्पष्टीकरण दिलं असतं, मी २८६ पैकी एक साधा आमदार आहे. त्यामुळे मला जे कळतं ते स्पष्टीकरण मी दिलं. याच्या व्यतिरीक्त तुमच्याकडे यापेक्षा जास्त माहिती असेल तर त्यांनी द्यायला पाहिजे असे प्रतुत्तर त्यांनी विरोधकांना दिलं. मी व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर याला वाचा फोडली, स्पष्टीकरण दिलं असे सत्तार म्हणाले.

याचा खुलासा देशाची सर्वोच्च संस्था याचा खुलासा करेल, माझ्या परिवाराच्या लोकांनी अपात्र म्हणून आल्यानंतर पात्र म्हणून काही फायदा घेतला असेल तर माझ्या मुलींवर कारवाई केली जावी, नसेल घेतला तर ज्यांनी नाव टाकलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असे सत्तार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.