औरंगाबाद : युतीबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच युतीबाबत ठरवतील बाकी कोणाला या विषयी ठरवण्याचा अधिकार नाही, असे सांगत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना टोला लगावला आहे. शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या आज रविवारी (ता.१९) प्रसंगी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) व सेना-भाजपचे पदाधिकारी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री औरंगाबादेत आले असता त्यांच्या भाषणापासूनच युतीची चर्चा सुरू झाली.
त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकत्र येत युतीबाबत पुढाकार घेण्याचे माध्यमांना सांगितले होते. याच विषयी चंद्रकांत खैरे यांनी दोन्ही राज्यमंत्र्यांना चिमटा काढत युतीबाबत निर्णय मुख्यमंत्री व पंतप्रधान घेणार असल्याचे सांगितले. चंद्रकांत खैरे म्हणाले की, युतीबाबत मुख्यमंत्री व पंतप्रधान ठरवतील होणार की नाही हे तेच ठरवतील. आम्ही बाप्पाकडे कोरोनाचा कहर कमी होऊ दे सर्वांना सुखात राहू दे, कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यांनी कडक लोकडाऊन लावल्यामुळे हे झाले आहे. आता लवकरात-लवकर मंदिर उघडावेत, अशी मी प्रार्थना करतो. युतीबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री व पंतप्रधानच घेतील, असा पुनरुच्चार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल आमदार अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिल मकरिये, जगदीश सिद्ध यांच्यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.