आज खासदार नसलो, तरीही मी खासदारापेक्षा अधिक काम करतो : चंद्रकांत खैरे

लोक मला खासदार म्हणत असल्याने मी सुद्धा खूश !
chandrakant khaire
chandrakant khairechandrakant khaire
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. या अगोदर औरंगाबादचे (Aurangabad) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाचीही चर्चा होत होती. मात्र त्यांच्याऐवजी पवार यांना शिवसेनेने संधी दिली आहे. यावर खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय पवार जुने आणि कडवट शिवसैनिक आहेत. शिवसैनिकाला संधी दिल्याने अभिमान असून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन ! मनात काहीच किंतू-परंतु नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदेश आम्हाला मान्य असल्याचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सांगितले. (Chandrakant Khaire Says, I Work More Compare To Member Of Parliament)

chandrakant khaire
नांदेडमध्ये भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख देवानंद जाजूंची आत्महत्या

मी जरी आज खासदार नसलो तरी मी खासदारापेक्षा जास्त काम करतो. माझ्यासमोर हे कोणीही काम करत नसल्याचा दावा त्यांनी केला. लोक मला खासदार म्हणत असल्याने मी सुद्धा खूश असल्याचे ते म्हणाले. उद्या गुरुवारी (ता.२६) संजय राऊत व संजय पवार हे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

chandrakant khaire
राजकीय घडामोडींना वेग; शिवसेना नेते संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

संभाजीराजे यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे शिवसेनेने संजय पवार हेच पक्षाचे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.