Online Service : ऑनलाइन कामांचा खेळखंडोबा, तहसीलमध्ये गर्दी...सर्वसामान्य लाभार्थी मारतात चकरा

Online Service : सिल्लोड तहसील कार्यालयात ऑनलाइन शिधापत्रिका प्रक्रियेतील अडचणीमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत आहेत, त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Online Service
Online Servicesakal
Updated on

सिल्लोड : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

नियमावर बोट ठेवून कामे करण्यात येत असल्याचा आव येथील अधिकारी आणत असून, आतापर्यंत अशा कामांसाठी पुरवठा विभागात मात्र अशी गर्दी कधीच बघावयास मिळाली नाही. अधिकारी बदलला की कामाची पद्धत बदलते असे जरी असले तरी संबंधित विभागाचे जे काम आहे, तेच काम करण्यासाठी मात्र कामाची पद्धत बदलत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी अनेक दिवसांपासून ऑनलाइन कामे सुरू असताना ही कामे व्यवस्थितरित्या होत नसल्याने नागरिक या कार्यालयाच्या पायऱ्‍या झिजवत आहे. शासनाने सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा देताना महात्मा जोतिबा फुले आरोग्य प्रमाणपत्र दिले आहे.

त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी नागरिक येत आहेत. मात्र,शिधापत्रिका ऑनलाइन असल्यानंतरच त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे ऑनलाइन असेल तरच प्रमाणपत्र मिळेल. परंतु, ऑफलाइन प्रमाणपत्र दिले तरी लाभार्थींचे दवाखान्यातील काम मार्गी लागते. परंतु, पुरवठा अधिकारी म्हणतात, ऑनलाइन शिधापत्रिकेमध्ये नावे असल्यास प्रमाणपत्र मिळेल नाहीतर नाही. यामुळे शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. तर, ही प्रक्रिया केल्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नागरिक या कामासाठी हैराण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.