Cha.Sambhajinagar: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पिकं आडवी झाल्याने उत्पादनाला मोठा फटका

Marathawada Rain Update: कापूस फुटण्याच्या काळात कापसाच्या कैऱ्या सडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत.
Cha.Sambhajinagar  Farmer in denger due rain crop suffer as water enter in farm
Cha.Sambhajinagar Farmer in denger due rain crop suffer as water enter in farmsakal
Updated on

गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात बुधवारी (ता.२५) सकाळपासून झालेल्या वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील कपाशी, मिरची, मका, ऊस, बाजरी, आडवी झाली.

सततच्या पावसामुळे शेंदुरवादा महसुली मंडळातील टेंभापुरी, गुरुधानोरा, नागापूर, शिवपूर, मांडवा, तांदुळवाडी, सावखेडा, मांगेगाव, कोंडापूर गावातील मूग, बाजरी, कापूस ही पिके पिवळी पडली, कापूस फुटण्याच्या काळात कापसाच्या कैऱ्या सडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत.

Cha.Sambhajinagar  Farmer in denger due rain crop suffer as water enter in farm
Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

 ऐन काढणीत आलेल्या बाजरी, सोयाबीन पिकही हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिके आडवी झाल्याने उत्पादनास मोठा फटका बसण्याची शक्यात आहे.

अती पावसामुळे तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीचा तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

— नवनाथ वगवाड, तहसीलदार.

शेतकऱ्यांनी पिकांतील तुंबलेले पाणी बाहेर काढावे. तुंबलेल्या पाण्यामुळे झाडांना जमिनीतील मूलद्रव्य शोषता येत नाही. बुरशीचा प्रादुर्भाव वाढवू नये म्हणून शिफारशीनुसार बुरशीनाशकाचा वापर करावा.

— बापूराव जायभाय, तालुका कृषी अधिकारी.

Cha.Sambhajinagar  Farmer in denger due rain crop suffer as water enter in farm
Manoj Jarange Patil: गरिबांसाठी लढतोय म्हणून मला घेरले जात आहे; जरांगे पाटलांचा आरोप

शेंदूरवादा परिसरात सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. शासनाने तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत करावी.

— ताराचंद दुबिले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती

Cha.Sambhajinagar  Farmer in denger due rain crop suffer as water enter in farm
Crime: हॉटेलमध्ये सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलिसांनी पाच संशयितांना ठोकल्या बेड्या, वाचा नक्की काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.