छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. मतदानाला गेल्यानंतर आपला मतदानाचा अधिकार बजावला गेला पाहिजे, यासाठी मतदार यादीत नाव असले, तरी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र असले पाहिजे..जर हे ओळखपत्र नसेल, तर निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल, तर त्यांना मतदान करता येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले. दरम्यान, मतदान केंद्रात मोबाइल नेला, तर कारवाई केली जाणार आहे..भारत निवडणूक आयोगाने ईपिक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर बारा ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान केंद्रात जाण्यापूर्वी आपला मोबाइल घरी ठेवावा किंवा मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मित्र किंवा नातेवाइकांकडे ठेवावा, त्यानंतर मतदान केंद्रात दाखल व्हावे; अन्यथा मोबाइलधारकाविरुद्ध कारवाई होऊ शकते..असे आहेत पुरावेमतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले ओळखपत्र, खासदार, आमदारांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे बारा पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत..असे शोधा नावमतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता यावे; तसेच मतदान केंद्र शोधता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे; तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकावर नाव किंवा मोबाइल क्रमांक सांगून मतदार यादीत कितव्या क्रमांकावर नाव आहे, मतदान केंद्र कोठे आहे, याची माहिती मिळविता येणार आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.