छत्रपती संभाजीनगर - एकदा मतदान केल्यानंतर दुबार होऊ नये, यासाठी मतदाराच्या बोटाला विशिष्ट शाई लावली जाते. त्या शाईची या निवडणुकीत मागणी वाढली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत औरंगाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या वाढल्याने शाईची मागणी वाढली आहे. शाईच्या ७ हजार २०० बाटल्या विधानसभेसाठी प्राप्त झाल्या.