Chatrapti Sambhji Nagar : आत्मज्ञानाच्या मार्गात अहंकार मोठा अडथळा

पंडित महेश पूर्णपात्रे; परंपरेतून चालत आलेले वेदांचे ज्ञान अथांग
Chatrapti Sambhji Nagar
Chatrapti Sambhji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असून आत्मज्ञानाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. त्यामुळे माणसाने ‘मी’पणाच्या या रोगातून बाहेर पडण्यासाठी योगसाधनेचा वापर करावा. आयुर्वेद हे असे ज्ञान आहे जे संकलन करुन इतरांना द्यावे.

भारताच्या इतिहासाचा एक भाग म्हणजे वेद, ज्याद्वारे शरीर, मन आणि भावनांवर नियंत्रण ठेवता येते, असे मार्गदर्शन संस्कृत विशारद पंडीत महेश पूर्णपात्रे यांनी केले.

श्री श्री जगद्‍गुरू शंकराचार्य महासंस्थानम्, दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम् शृंगेरी, श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठाण, श्रीकृष्ण गुरुकूल वेदपाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दोन दिवसीय वैदिक संमेलन सुरु आहे. यात शुक्रवारी (ता.चार) सकाळच्या चर्चासत्रात श्री. पूर्णपात्रे यांनी वेदांवर भाष्य केले.

Chatrapti Sambhji Nagar
Chh. Sambhaji Nagar: एक कोटी चाळीस लाख रुपयांची इमारत धूळखात पडून; मुलींचे वसतिगृह मद्यपींच्या ताब्यात

ते म्हणाले, की आयुर्वेदात सर्व रोगांचे अंतिम कारण निसर्गाच्या नियमांचे माणसाने केलेले विकृत रूप सांगितले आहे. म्हणून पहिल्यांदा निसर्गाचा आदर करायला शिका. परंपरेतून चालत आलेले वेदांचे ज्ञान अथांग आहे. ते इतरांना दिल्याने परमानंद प्राप्त होतो. सगळ्या वेदांचे सार यज्ञात आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पहिल्यांदा शरीराचे लाड करणे बंद करा, तरच ते कठोर होईल.

Chatrapti Sambhji Nagar
Chhatrapati Sambhajinagar : दहशत माजविणाऱ्या टोळीची पुंडलिकनगर परिसरात धिंड

मला ईश्वराचे ऐश्वर्य नको, मला इश्वरच पाहिजे यासाठी ध्यान करायला हवे. स्वतःला ईश्वराला समर्पित करा, त्याच्याशी एकरुप व्हा. सूक्ष्म धर्मचिंतन व गंभीर ब्रम्हचिंतन वेदांमुळेच शक्य होते. मूर्धन्य विचारांची खळाळती ज्ञानधारा वेद आहेत. ईश्वर दर्शन, समाधीलाभ, मोक्षानंद, स्वानंदलाभ वेदामुळेच मिळतो. नेत्रदर्पण, स्थैर्य, वामनवली, विविध मुद्रा याविषयीही त्यांनी माहिती दिली.

गुरुवर्य शांताराम भानुसे गुरुजी यांनी सांगितले, की विश्वाचे वाड्‍मय म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद असे चार वेद आहेत. प्राचीन काळी सप्तर्षी नावाचा सात ऋषींचा समूह होता. वेदांमध्ये या सात ऋषींना वैदिक धर्माचे रक्षक मानले गेले आहे.

Chatrapti Sambhji Nagar
Chh. Sambhaji Nagar : जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला राजीनामा

या ऋषींवर विश्वाचा समतोल राखण्याची आणि मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी आहे. वेदांमध्ये नमूद केलेल्या श्लोकात वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, अत्री, जमदग्नी, गौतम ऋषी या सप्तऋषींची नावे सांगितली आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, सप्तर्षींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मष्तिकातून झाली असून त्यांना ज्ञान, विज्ञान, धर्म-ज्योतिष आणि योग या सर्वांत श्रेष्ठ मानले आहे.

वेदांची परंपरा टिकून राहण्यासाठी वैदिक संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जाते. असे संमेलन देशभरात नऊ ठिकाणी होतात. राज्यातील संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे होत असल्याने शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे भानुसे गुरुजी म्हणाले. दुपारच्या सत्रात वैदिकशास्त्रांवर परिसंवाद झाला. त्यानंतर पद्मश्री व्ही. आर. गौरीशंकर यांच्याहस्ते वैदिक विशारद पंडितांचा सत्कार करण्यात आला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()