Chatrpati Sambhajinagar : स्वामी रामानंद तीर्थ यांचा दिल्लीत पुतळा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य ,शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दोन हजार ७७४ कोटी
cm eknath shinde
cm eknath shindesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर -‘‘मराठवाडा मुक्तिसंग्राममध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या निजामकालीन तीन पुलांचे आयुष्य संपले असून, या पुलांची कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल’’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.१६) केली.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील वंदेमातम् सभागृहात महापालिकेच्या ४५७ कोटींच्या विविध विकासकामांचे उद्‍घाटन व लोकार्पण श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार, खासदार सय्यद इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, संजय शिरसाट, हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, नारायण कुचे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत उपस्थित होते. यावेळी प्रशांत देशपांडे आणि मुकूंद भोगले यांनी शहराच्या विकासासंदर्भात विविध मागण्या केल्या.

cm eknath shinde
Pune News : समाजमंदिराच्या ठिकाणी महापालिकेतर्फे होणार आरोग्य केंद्रे

मुख्यमंत्री म्हणाले...

मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दोन हजार ७७४ कोटी

शहरात दर्जेदार रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटींचा निधी

पैठण येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींचा निधी मंजूर

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राच्या सहकार्याने वॉटरग्रीड प्रकल्प

cm eknath shinde
Marathwada : मुक्तीसाठी विश्वनाथ राजहंस यांनी पत्करले हौतात्म्य

नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी काम सुरू

जलसंधारणातून दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढणार

सिंचनाचे ग्रीड, लहान लहान साखळी धरणांची निर्मिती

वातावरण अनुकूल पिकांची शिफारस, कोल्ड स्टोरेजेस तयार करणार

जलयुक्त शिवार अभियानचा टप्पा-२ प्रभावीपणे राबविण्यात येणार.

३५ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

यातून तब्बल आठ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

cm eknath shinde
Marathwada Muktidin : शिक्षणात मराठवाड्याचे पाऊल पडते पुढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.