Chh. Sambhaji Nagar : पैठण नाथसागरात सापडलेला १२ किलो वजनाचा मासा

नाथसागर धरणात यापूर्वी अनेकदा कधी २०किलो तर कधी ३० व ४०‌किलो वजनाचा मासा सापडला आहे.
12kg fish
12kg fishsakal
Updated on

पैठण - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथ सागर धरणात १२ किलो वजनाचा कटला जातीचा मासा रविवारी (ता.५) मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला.

सोनवाडी येथील मच्छीमार घन:श्याम केथा यांनी नाथ सागर जलाशयात नेहमी प्रमाणे यासाठी पकडण्यासाठी जाळी सोडली . रविवारी सकाळी जाळी काढण्यासाठी गेले असता त्यांना जाळ्यात भला मोठा मासा अडकल्याचे लक्षात आले.यानंतर लगेच त्यांनी या मोठ्या या माशाला पकडले. हा मासा दक्षिण जायकवाडी येथे विक्रीसाठी ठेवला असता तीनशे रुपये किलोने अवघ्या दहा मिनिटात या माशाची विक्री झाला. यातून ३ हजार सहाशे रुपये मच्छिंद्र घन:श्याम केथा यांना मिळाले आहे.

12kg fish
Chh. Sambhaji Nagar : बालविवाह रोखण्यासाठी सरसावले विद्यार्थी ; जिल्ह्यातील ३,४६४ शाळांमध्ये घेतली शपथ

मासा घेण्यासाठी खवय्यांनी केली गर्दी!

दरम्यान, १२ किलो वजनाचा मासा सापडल्याची वार्ता खवय्या नागरिकात पसरताच खवय्यांनी पोलिस ठाण्या जवळील मासाळी मार्केट मध्ये मासा खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. रविवार हा खाता वार असल्याने व १२ किलो माश्याची चव ही वेगळी लागत असल्यामुळे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

12kg fish
Sambhaji Bhide : राजकारण्यांमुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली - संभाजी भिडे

नाथसागर धरणात यापूर्वी अनेकदा कधी २०किलो तर कधी ३० व ४०‌किलो वजनाचा मासा सापडला आहे.अलिकडच्या काळात बऱ्याच वर्षांनंतर हा १२ किलो वजनाचा मासा सापडला आहे. विशेष बाब म्हणजे नाथसागरातील मासाळी गोड्या पाण्यातील मासाळी असल्याने खमंग अशी चव खाताना मिळते‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.