Chh. Sambhaji Nagar : ‘एक दिवस एक तास’ स्वच्छता मोहिमेत १७ हजार नागरिकांचा सहभाग ; अभियानातून तब्बल ६३ टन कचरा जमा

शहागंज, बुद्ध लेणी परिसर, विद्यापीठ परिसरात सकाळी १० ते ११ यावेळेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ‘एक दिवस एक तास’ श्रमदान मोहीम विविध ठिकाणी राबविण्यात आली. शहरात ५६२ ठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये ६३ टन कचरा गोळा करून प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला आहे. महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी, राजकीय प्रतिनिधी, विद्यापीठ, जिल्हा व्यापारी महासंघ सदस्य, छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, सेवाभावी संस्था, प्लोगर्स ग्रुप, नागरी मित्र पथक, महिला बचत गट, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक-विद्यार्थी, असे सुमारे १७ हजार जण या महास्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या येथील केंद्रीय संचार ब्युरोचे प्रादेशिक कार्यालयातर्फे व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, नेहरू युवा केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मौलाना आझाद महाविद्यालय, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विकास डेव्हलपर्स, छत्रपती संभाजीनगर प्लोगर्स,

मुक्तानंद महाविद्यालय आदी संस्थांच्या सहकार्याने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित या अभियानाला नागरिकांचा उत्स्फृर्त प्रतिसाद लाभला. शहागंज, बुद्ध लेणी परिसर, विद्यापीठ परिसरात सकाळी १० ते ११ यावेळेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

sambhaji nagar
Chh. Sambhaji nagar : ‘माउंट मनास्लू’वर रफिक शेख यांची यशस्वी चढाई

डॉ. कराड यांनी हे अभियान एका दिवसापुरते मर्यादीत न ठेवता जनआंदोलनाचे स्वरूप देऊन दररोज आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. दररोज किमान दोन तास स्वच्छतेसाठी देऊन आपला परिसर स्वच्छ राहिला तर कोणीच आजारी पडणार नाही, असेही ते म्हणाले. शेवटी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली व वृक्षारोपण करण्यात आले.

sambhaji nagar
Nagpur : ‘डीजे’ चा गोंगाट ; पोलिसांकडील उपकरणे ठरली शोभेची

डाॅ. कराड यांच्याकडून आवाहन

महापालिकेतर्फे शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अभियानाला प्रारंभ केला. यावेळी डाॅ. कराड म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आपापला परिसर स्वच्छ ठेवला तर आजारपणापासून दूर राहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.