Chh. Sambhaji Nagar : शाळांमधील संगणकांना लागली धूळ!

जिल्ह्यातील स्थिती आधुनिक शिक्षणापासून ‘झेडपी’चे विद्यार्थी वंचित
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, याकरिता सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असताना जिल्ह्यातील ५० हून अधिक शाळांमध्ये संगणक जोडणीअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना संगणकांची माहिती व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना शालेय शिक्षण विभाग काय करतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जुलै महिन्यात संगणक शाळेत पोचविण्यात आले होते. मात्र, शाळेमध्ये संगणकासाठी फर्निचर व्यवस्था बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे जोडणीअभावी जिल्ह्यातील तब्बल ५० शाळामध्ये प्रत्येकी ५० संगणक, एक प्रिंटर, बॅटरी, इन्व्हटर, प्रोजेक्टर असे साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांनी फर्निचरची व्यवस्था करून लाईट फिंटीग करुन घेतली आहे. केवळ संगणक इन्स्टॉल करणे बाकी आहे.

यासाठी संबंधित पुरवठादाराला जोडणीबाबत शिक्षक विचारणा करीत आहेत, मात्र त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच ज्या शाळांना संगणक उपलब्ध झालेले आहे. या ५० शाळांना दोन वर्षांपूर्वी आयसीटी लॅबसाठी २० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, संबंधित अनुदान जिल्हा परिषदेने परत मागवून घेतले. या प्रकरणाबाबत समग्र शिक्षा अभियान समन्वयकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.

sambhaji nagar
Chatrapti Sambhji Nagar : आत्मज्ञानाच्या मार्गात अहंकार मोठा अडथळा

पुरवठादार म्हणतो...

‘‘फर्निचरचे कंत्राट आम्हाला दिलेले नाही, त्यामुळे जोपर्यंत फर्निचर उपलब्ध

होत नाही, तोपर्यंत संगणक जोडणी होऊ शकत नाही.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात ८ ते दहा शाळांना प्रत्येकी दहा संगणक संच संगणक लॅब या सदराखाली पुरवण्यात आले आहे. जिल्हाभरात अशा जवळपास ५० हून अधिक शाळा आहेत. या शाळांना संगणक पुरवठा होऊन जवळपास ३ महिने उलटून गेले आहेत. अद्याप तेथे संगणकांची जोडणी करण्यात आलेली नाही.

- राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

sambhaji nagar
Ahmednagar : ‘एमपीडीए’ कारवाईत नगर टॉप; वाळूतस्करांसह धोकादायक व्यक्तींच्या विरूद्ध ‘एमपीडीए

पुरवठादारांचे म्हणणे आहे की, फर्निचरचे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दिलेले नाही. जोपर्यंत फर्निचर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत संगणक जोडणी होऊ शकत नाहीत. संबंधित शाळांना दोन वर्षांपूर्वी आयटीसी लॅबचे २० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, जिल्हा परिषदेने ते परत घेतले आहे. अशा घोळात हे काम पेंडिंग पडलेले आहे.

- ईश्वर वैष्णव, मुख्याध्यापक, कन्नड

शिक्षण विभाग म्हणतो...

‘‘संबंधित पुरवठादाराला संगणक बसविण्यासाठीच्या फर्निचरचेही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. त्यांनी याची व्यवस्था अद्याप केलेली नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()