fack doctor
fack doctor sakal

Chh. Sambhaji Nagar : बोगस डॉक्टरांना बसणार चाप जिल्हाभरात सुरू होणार तपासणी मोहीम

या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Published on

छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. परंतु हे डॉक्टर कोणालाच घाबरत नसल्यामुळे यांचा व्यवसाय फोफावला आहे. मात्र, आता या बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हाभरात तपासणी मोहीम सुरू होणार असून यात नोंदणी नसलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे जिल्ह्यात दवाखाने उघडत रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. यावर नोंदणी (रजिस्ट्रेशन) नसल्याचे डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

fack doctor
Chh. Sambhaji Nagar : लाभार्थ्यांनी आता ईजीएस ॲपवर अर्ज करावा; संदीपान भुमरे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

दरम्यान वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनास अहवाल प्राप्त झाले असून त्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे व नोंदणी नसणाऱ्यांच्या कागदपत्रांचीही तपासणी गरज भासल्यास तीही केली जाईल. जर बनावट डॉक्टर आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मीना यांनी सांगितले.

fack doctor
Chh. Sambhaji Nagar : बनावट औषधी विक्रीचा पर्दाफाश शहरात आढळला युरिमॅक्स- डीचा बनावट साठा

अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय अनेकजण करत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने तपासणी मोहीम राबविण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरांवरून अहवाल मागविण्यात आले आहेत.

विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.