Chh. Sambhaji Nagar : लाभार्थ्यांनी आता ईजीएस ॲपवर अर्ज करावा; संदीपान भुमरे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

लाभार्थ्यांनी आता ईजीएस अॅपवर अर्ज करावा
sandipan bhumre
sandipan bhumre sakal
Updated on

पैठण - आता बागायती लागवड, विहिरी आदींचा रोजगार हमी योजनेत लाभ घेण्यासाठी इजीएस हॉर्टी हे ॲप महाराष्ट्र शासनाने सुरु केले आहे. यापुढे या अॅपवरच लाभार्थी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे, माहिती सोमवारी (ता.१६) रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.

या ॲपवर लाभार्थी व शासन विभागांसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. यामध्ये लाभार्थ्यांना बागायती लागवड व विहिरींसाठी अर्ज करायचा असल्यास त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या अर्जाची ती नेमकी काय आहे? हे जाणून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रेही अपलोड कागदपत्रांची माहिती असून ती व्यवस्था आहे. त्यात जॉबकार्ड क्रमांक, दोन हेक्टरच्या सातबारा, मर्यादेत जमीन असल्याची नोंद, लाभार्थ्यांची वर्गवारी याचीही नोंद करता येणार आहे.

दरम्यान, फळबागांचे काम रोजगार हमी योजनेत होण्यासाठी जिल्ह्यांना उद्दिष्ट मिळणार आहे. या नव्या मोहिमेसाठी नुकतीच बैठक विभागीय स्तरावर घेण्यात आली आहे.

या योजनेविषयी यात माहिती देण्यात आली आहे. बांबू लागवड करण्यासही उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात फळबागा विकसित करण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.

sandipan bhumre
Chh. Sambhaji Nagar : ऑनलाइन ‘गेम’मुळे आयुष्याचा खेळ! शहरातील किशोरवयीन मुलांना मोहाचा फास

दिवसेंदिवस रोहयो हायटेक होत हे. आता लाभार्थ्यांना अर्जही ऑनलाइन करता येणार असल्याने व त्याची स्थितीही त्याच ठिकाणी कळणार असल्याने आगामी काळात हा विभाग आणखी हायटेक होणार आहे. इतरही काही ॲप विकसित करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. ते आल्यास त्याचा मोठा लाभार्थी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

-संदीपान भुमरे, रोहयो तथा पालकमंत्री (छत्रपती संभाजीनगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.