Chh. Sambhaji Nagar : प्लॅस्टिक फुलांमुळे कोमेजतोय निसर्ग; पर्यावरणाची हानी, फुलशेतीवर झाला ६० टक्के प्रतिकूल परिणाम

घरोघरी शोभेची वस्तू म्हणूनही कृत्रिम विशेषत: प्लॅस्टिक फुले पोचली आहेत.
plastic flower
plastic flower sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - गंध फुलांचा गेला सांगून; तुझे न् माझे व्हावे मीलन’ असे गाणे गुणगुण्याचे दिवस प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांनी घालवले. बघताच मनमोहून घेणारी फुले आणि मनाला भुरळ पाडणारा त्यांचा सुगंध प्लॅस्टिकच्या फुलांमुळे आपण विसरत आहोत की काय अशी परिस्थिती आज आहे. केसांमध्ये माळण्यासाठीच्या गजऱ्यापासून दारावरचे तोरण, देवपूजा, सण उत्सवाची सजावट करण्यापर्यंत फुलांचा वापर होतो. मात्र, प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे आपण फुलांच्या नैसर्गिक सुगंधाला मुकत आहोत. दुसरीकडे ही प्लॅस्टिकची कृत्रिम फुले पर्यावरणाचे नुकसान करीत आहेत. यामुळे निसर्गाकडे चला हा मार्ग अनुसरण्याची गरज आहे.

घरोघरी शोभेची वस्तू म्हणूनही कृत्रिम विशेषत: प्लॅस्टिक फुले पोचली आहेत. सण, समारंभाव्यतिरिक्तही बाजारपेठा कृत्रिम फुलांनी सजलेल्या आहेत. त्याचबरोबर रासायनिक रंगाचा वापर यामुळे प्लॅस्टिकची फुले पर्यावरणदृष्ट्या अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फूल व्यवसाय हा अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही चांगले आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. दसरा, दिवाळी, पाडव्याला तर हमखास चांगला भाव मिळायचा. त्यामुळे थोड्याशा जमिनीत फुले लावून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळायचे मात्र प्लॅस्टिक फुलांमुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजत आहे.

गेल्या दहा वर्षांत कृत्रिम विशेषत: प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज केली आहे. ही फुले हव्या त्या रंगात, विविध आकारांत, थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आकर्षक पद्धतीने बनविलेली असतात. शिवाय ही फुले हाताळायला सोपी असल्याने ग्राहक या प्लॅस्टिकच्या फुलांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.

त्यामुळे सण, उत्सव, घरगुती समारंभाचे स्वरूप वाढत असले, तरी नैसर्गिक फुलांचा वापर मात्र कमी होत आहे. एकीकडे प्लॅस्टिकवर बंदी घालण्याच्या गोष्टी केल्या जातात तर दुसरीकडे प्लॅस्टिकच्या फुलांवर कसलीच बंदी नाही. प्लॅस्टिकमुळे होणारे नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाला होणारा धोका विचारात घेऊन या फुलांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कृषी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये महाराष्ट्रात १२२.६५० टन फुलांचे उत्पादन झाले. हे प्रमाण घटून २०२३ मध्ये ५६.९४९ टनावर आले आहे.

plastic flower
Chh. Sambhaji Nagar : पाळीव प्राण्यांना लागणार परवानगी; अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई

मानवी आरोग्यावरही परिणाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बी. एल. चव्हाण म्हणाले, सिंगल युज प्लॅस्टिकच्या पिशव्यांसारखाच प्लॅस्टिकच्या फुलांचा पर्यावरणावर परिणाम होतो. लवकर विघटन होत नाही. विघटित प्लॅस्टिकचे कण किंवा प्लॅस्टिकची फुले जर पाण्यात मिसळली तर हळूहळू तापमान वाढीबरोबर त्यांचा अंश पाण्यात उतरतो. विघटित झालेले हे प्लॅस्टिक पिण्याच्या पाण्यात मिसळले गेले तर ते मानवी शरीरात प्रवेश करू शकते. प्रसंगी, असे पाणी पिणाऱ्यांच्या शरीरात प्लॅस्टिक पोचू शकते. स्तनदा मातांच्या दुधात त्याचा अंश उतरू शकतो. त्याला मायक्रो प्लॅस्टिक म्हणतात. हे लघूकण दुधातून बालकांच्या शरीरात प्रवेश केल्यावर बालकाला मेंदूचे झटके येणे किंवा मेंदूवर परिणाम होणे, त्यांच्या नाजूक शरीराच्या इतर अवयवांवरही विकृती निर्माण होण्यासारखे अनेक परिणाम होऊ शकतात.

plastic flower
Chh. Sambhaji Nagar : ‘ उपरवाला ’सब देख रहा है! जिल्ह्यातील ११३ गावांत दोन हजार ७८ सीसीटीव्ही

फुलांचा रंग, सुगंध नैसर्गिक असतो.

प्रक्रिया करून अन्य पदार्थ करता येतात.

पर्यावरणाला कोणताही धोका नाही.

शेतामध्ये मित्रकिडींची

संख्या वाढते.

मित्र किडींमुळे अन्य पिकांवरील कीडरोगांवर नियंत्रण होते.

औषधे, कीटकनाशकांची आवश्‍यकता कमी होते.

शेती उत्पादनात वाढ होते.

मी गेली ३० वर्षांपासून फुलशेती करतोय. सध्या गुलाब, शेवंती, झेंडू शेतात आहे. दसरा, दिवाळी मोठं फुलांसाठी मोठे मार्केट पण प्लॅस्टिक फुलांमुळे कमी किमतीत फुले विकावी लागत आहेत. प्लॅस्टिकच्या फुलांमुळे फुलशेतीवर ६० टक्के प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे आता फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न आहे.

plastic flower
Chh. Sambhaji Nagar : पाळीव प्राण्यांना लागणार परवानगी; अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई

- शेषराव विखे पाटील, फुलउत्पादक, पोखरी

बाजारात उपलब्ध असणारी प्लॅस्टिकची फुले पॉलिथिनपासून तयार केली आहेत. त्यांच्या विघटनास १००-१५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. नागरिकांनी प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळला पाहिजे किंवा किमान प्लास्टिकची फुले केवळ एक वेळ वापरुन ती रिसायकलींगसाठी संकलित करुन महापालिकेच्या कचरा संकलकांकडे दिले पाहिजे.

- प्रा. डॉ. बी. एल. चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.