Chh. Sambhaji nagar : धावत्या रेल्वेने फरफटत नेली आजीबाई,महिला पोलिसाच्या सतर्कतेने वाचले प्राण

रेल्वेस्थानकावर आल्यानंतर त्यांना शिर्डी-तिरुपती एक्स्प्रेसमध्ये रेल्वेचे दार बंद दिसले.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - धावत्या रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या ७५ वर्षीय आजीबाई रेल्वेस्थानकावर फरफटत गेल्याचा प्रकार बुधवारी (ता. वीस) रात्री घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या आजीला जीव धोक्यात घालून महिला रेल्वे पोलिसांनी सुरक्षित बाहेर ओढल्याने अनर्थ टळला आणि आजीचा जीव वाचला.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

सूत्रांच्या माहितीनुसार गायत्रीनगर, नांदेड येथील ७५ वर्षीय महिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या मुलीच्या घरून नांदेडकडे जाण्यासाठी निघाली होती. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर त्यांना शिर्डी-तिरुपती एक्स्प्रेसमध्ये रेल्वेचे दार बंद दिसले.

आतून कुणीतरी दार उघडेल या आशेने त्या रेल्वेच्या साइड रॉडला धरून उभ्या होत्या. याच दरम्यान, रेल्वे सुरू झाली, त्यामुळे रेल्वे चुकेल म्हणून आजीबाईने रॉडला घट्ट पकडून पायऱ्यांवर पाय दिला. मात्र, याच वेळी रेल्वेने वेग घेतल्याने त्यांचे पाय खाली आले आणि त्या सुमारे ५० ते ६० मीटर फरफटत गेल्या.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : शहरावर आता ड्रोनची नजर

हा प्रकार लक्षात येताच प्रसंगावधान राखत महिला पोलिस अंमलदार धरती ठवकर व अन्य एका प्रवाशाने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत आजीला रेल्वेपासून सुरक्षित बाजूला ओढले. तोपर्यंत अन्य प्रवासीही मदतीला धावले होते. पोलिसांच्या सतर्कतेबद्दल प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे.

sambhaji nagar
Ahmednagar : सोनईत रंगभरणातून पर्यावरणाचा श्रीगणेशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()